
चालू घडामोडी | संचार साथी पोर्टल आणि ॲप | Sanchar Saathi Portal and App

संचार साथी पोर्टल आणि ॲप
Sanchar Saathi Portal and App
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) संचार साथी पोर्टल आणि ॲप खालील पैकी कशाशी संबंधित आहे ?
1. शेती व्यवस्थापन
2. मोबाईल सुरक्षितता व फसवणूक प्रतिबंध
3. पाणीसंपदा संरक्षण
4. हवामान बदल अभ्यास
उत्तर : मोबाईल सुरक्षितता व फसवणूक प्रतिबंध
बातमी काय ?
• मुंबई LSAच्या दूरसंचार विभागाचे संचालक विनय जांभळी आणि उपमहासंचालक (DDG) सुमनेश जोशी यांनी महाराष्ट्रातील नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहण्याचे आवाहन केले.
“संचार साथी” म्हणजे नेमकं काय ?
• मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे.
• या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना त्यांच्या मोबाईल कनेक्शनवर नियंत्रण, फसवणुकीपासून संरक्षण, आणि सुरक्षा धोक्यांची तक्रार करण्याची सुविधा मिळते.
• संचार साथीमुळे हरवलेला मोबाइलचा गैरवापर रोखणे, फ्रॉड कॉल्सची तक्रार, आणि सुरक्षा यंत्रणांशी थेट समन्वय शक्य झाला आहे.
‘संचार साथी’ उपक्रमाचा उद्देश कोणता ?
• भारतातील प्रत्येक मोबाइल वापरकर्त्याला सुरक्षित, पारदर्शक आणि फसवणूक-मुक्त डिजिटल सेवा उपलब्ध करून देणे.
संचार साथीच्या प्रमुख सुविधा कोणत्या ?
• Know Your Mobile Connections : तुमच्या नावावर किती SIM वापरले जात आहेत हे तपासता येते.
• Block Lost/Stolen Mobile : हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाइलचे IMEI ब्लॉक करता येते.
• Verify IMEI : तुमच्या डिव्हाइसचा IMEI नंबर आणि प्रामाणिकता तपासता येते.
• Chakshu Service : फसवे कॉल, एसएमएस किंवा WhatsApp संदेशांची तक्रार करता येते.
• Find ISPs : तुमच्या परिसरातील अधिकृत इंटरनेट सुविधा देणाऱ्यांची माहिती मिळते.
• Trusted Contact Details : वेबसाइट, मेल किंवा संपर्क क्रमांकाची प्रामाणिकता पडताळता येते.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी ?
• मोबाइलमधील अनावश्यक ॲप्स काढून टाका.
• फोन नेहमी नवीनतम सुरक्षा अपडेटसह ठेवा.
• *#06# डायल करून IMEI नंबर जतन करून ठेवा.
• हरवलेला मोबाइल लगेच संचार साथीवरून ब्लॉक करा.
IMEI म्हणजे काय ?
• IMEI चा फूल फॅार्म International Mobile Equipment Identity असा आहे.
• IMEI हा प्रत्येक मोबाइल फोनला दिलेला 15 अंकी वेगळा ओळख क्रमांक असतो.
IMEI चा उपयोग काय ?
• मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर हा नंबर वापरून तो ब्लॉक करता येतो.
• पोलिस आणि DoT हा नंबर वापरून मोबाइल शोधू शकतात.
• एकाच मॉडेलचे लाखो फोन असले तरी IMEI नंबर वेगळा असतो, म्हणून फोनची ओळख निश्चित होते.
IMEI कसा पाहायचा ?
• आपल्या मोबाइलमध्ये *#06# डायल करा — लगेच IMEI नंबर दिसेल.






















![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)