
चालू घडामोडी | राष्ट्रीय शिक्षण दिन | National Education Day

राष्ट्रीय शिक्षण दिन
National Education Day
Subject : GS - दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून खालील पैकी कोणच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
1. लोकमान्य टिळक
2. मौलाना अबुल कलाम आझाद
3. रविंद्रनाथ टागोर
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उत्तर : मौलाना अबुल कलाम आझाद
राष्ट्रीय शिक्षण दिवसाबद्दल महत्त्वाची माहिती :
• मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरी करण्यात येतो.
• मौलाना अबुल कलाम आझाद (Maulana Abul Kalam Azad) हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री होते.
पहिला राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 11 नोव्हेंबर 2008 पासून राष्ट्रीय शिक्षण दिन साजरी करण्यात येतो.
• मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या शिक्षणातील योगदानाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने 2008 मध्ये, 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून घोषित केला.
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या योगदाना संदर्भात IMP वनलाईनर पॉईंट्स :
• मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला होता.
• भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देखील त्यांनी सहभाग घेतला होता. ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक होते.
• स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण (National Education Policy) तयार केले.
• मोफत प्राथमिक शिक्षण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते.
• इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) आणि विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) च्या स्थापनेचं श्रेय मौलाना आझाद यांना दिलं जातं.
• त्यांनी शिक्षण आणि सांस्कृतिक विकासासाठी संगीत नाटक अकादमी, साहित्य अकादमी आणि ललितकला अकादमी सारख्या संस्थांची देखील स्थापना केली.




















![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)

