
चालू घडामोडी | COP30 - संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद 2025 | COP30 – UN Climate Summit 2025

COP30 - संयुक्त राष्ट्र हवामान शिखर परिषद 2025
COP30 – UN Climate Summit 2025
Subject : GS - जागतिक संघटना, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 मध्ये COP 30 परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली ?
1. भारत
2. जपान
3. ब्राझील
4. जर्मनी
उत्तर : ब्राझील (Brazil)
बातमी काय ?
• संयुक्त राष्ट्रांची 30 वी हवामान परिषद (COP30) ब्राझीलच्या बेलें शहरात सुरू झाली आहे.
• ही पॅरिस कराराच्या 10 वर्षांच्या पूर्तीनिमित्त आयोजित केली गेली आहे.
• यावेळी देशांनी दिलेल्या हवामान वचनांचे प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी करावी, यावर चर्चा होईल.
• परिषदेत हवामान वित्त, तंत्रज्ञान आणि अनुकूलन (Adaptation) या क्षेत्रांतील ठोस उपायांवर भर दिला जाणार आहे.

COP30 म्हणजे काय ?
• COP चा फूल फॅार्म Conference of the Parties असा आहे.
• 30 म्हणजे ही COP ची 30 वी हवामान परिषद आहे.
• COP30 ही संयुक्त राष्ट्रांच्या UNFCCC (United Nations Framework Convention on Climate Change) अंतर्गत वार्षिक हवामान परिषद आहे.
• येथे सर्व देश एकत्र येऊन पॅरिस कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतात.
• तसेच हवामान बदल थांबवण्यासाठीचे पाऊल ठरवतात.
• याठिकाणी उत्सर्जन कमी करणे, हवामान वित्त (Climate Finance) आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर चर्चा केली जाते.
संयुक्त राष्ट्रांची 30 वी हवामान परिषद (COP30) चे यजमान देश व ठिकाण कोणते ?
• देश : ब्राझील 🇧🇷
• शहर : बेलें (Belém) — अॅमेझॉन जंगलाजवळील पर्यावरणीय केंद्र.
उद्दिष्ट (Aim) :
• COP30 ला “Implementation COP” बनवणे — म्हणजे दिलेली वचने कृतीत आणणे.
• सर्व देशांना हवामान कृतीत समान जबाबदारीने सहभागी करणे.
• हवामान बदलामुळे प्रभावित गरीब व विकसनशील देशांना वित्त व तंत्रज्ञानाने मदत करणे.
• विकास व पर्यावरण यामध्ये समतोल राखणे.
• सर्वांना न्याय्य आणि समावेशक हवामान संक्रमणात सहभागी करणे.






















