
चालू घडामोडी | वॉटरशेड महोत्सव 2025 | Watershed Mahotsav 2025

वॉटरशेड महोत्सव 2025
Watershed Mahotsav 2025
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) वॉटरशेड महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणी आणि कुठे केले ?
1. पंतप्रधान, दिल्ली
2. कृषी मंत्री, गुंटूर
3. मुख्यमंत्री, मुंबई
4. जलशक्ती मंत्री, जयपूर
उत्तर : कृषी मंत्री, गुंटूर (आंध्र प्रदेश)
बातमी काय ?
• 11 नोव्हेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशच्या गुंटूर शहरात वॉटरशेड महोत्सव साजरा करण्यात आला.
• या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.
• या महोत्सवाचा उद्देश म्हणजे पाणी व माती वाचवणे आणि यासाठी जनतेचा सहभाग वाढवणे.

वॉटरशेड महोत्सव म्हणजे काय ?
• हा पाणी आणि माती वाचवण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे.
• यात गावकरी, अधिकारी आणि विद्यार्थी सर्वजण एकत्र येऊन जलसंधारणाचे महत्त्व समजवतात.
• पाऊस कमी पडला तरी शेतात पाणी टिकून राहावे हा यामागचा हेतू आहे.
वॉटरशेड महोत्सवाची सुरुवात कशी झाली ?
• हा कार्यक्रम ग्रामीण विकास मंत्रालय आणि भूमी संसाधन विभाग (Department of Land Resources) यांच्या पुढाकाराने सुरू झाला.
• तो राष्ट्रीय वॉटरशेड परिषद 2025 चा एक भाग आहे.
वॉटरशेड महोत्सवाचे उद्दिष्ट कोणते ?
• जनभागीदारी वाढवणे : पाणी आणि माती वाचवण्यासाठी लोक, शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक संस्था एकत्र आणणे.
• जलसंधारणमजबूत करणे : गावातील तलाव, विहिरी, नाले, आणि इतर पाणीस्रोत दुरुस्त करून पावसाचे पाणी साठवणे.
• मृदा संवर्धन : माती वाहून जाणे थांबवणे आणि शेतीची जमीन सुपीक ठेवणे.
• ग्रामीण भागात पाणीटंचाई कमी करणे : पाण्याची उपलब्धता वाढवून शेतकऱ्यांना मदत करणे.
• जुने जलसंधारण प्रकल्प दुरुस्त करणे : जुने बांध, नालेबांध, तलाव इ. पुन्हा वापरात आणणे.
• शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे : पाण्याचा योग्य वापर करून टिकाऊ शेती करणे.
• पर्यावरण आणि झाडांचे संरक्षण : वृक्षारोपण, झऱ्यांचे पुनरुज्जीवन आणि हरित क्षेत्र वाढवणे.
• रोजगार निर्माण करणे : MGNREGA सारख्या योजनांद्वारे गावातच कामाच्या संधी निर्माण करणे.
• वॉटरशेड जनभागीदारी कप 2025 : वॉटरशेड जनभागीदारी कप देऊन उत्तम काम करणाऱ्यांचा गौरव करणे.
निष्कर्ष :
• वॉटरशेड महोत्सव म्हणजे “पाणी वाचवा, माती वाचवा” हा संदेश देणारा कार्यक्रम आहे.
• यामुळे गावात पाणी साठेल, शेतीला मदत मिळेल आणि पर्यावरणही सुरक्षित राहील.

















