
चालू घडामोडी | जागतिक न्यूमोनिया दिन | World Pneumonia Day

जागतिक न्यूमोनिया दिन
World Pneumonia Day
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक न्यूमोनिया दिवस केव्हा साजरी केला जातो ?
(सरळसेवा भरती, SSC GD 2021, SBI 2019)
1. 18 डिसेंबर
2. 5 सप्टेंबर
3. 12 नोव्हेंबर
4. 15 ऑक्टोबर
उत्तर : 12 नोव्हेंबर
न्यूमोनिया आजारा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• न्यूमोनिया आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 12 नोव्हेंबरला 'जागतिक न्यूमोनिया दिन' साजरा केला जातो.
• जागतिक न्यूमोनिया दिवस पहिल्यांदा 12 नोव्हेंबर 2009 रोजी साजरी करण्यात आला.
• 2009 मध्ये ग्लोबल कोॲलिशन अगेन्स्ट चाइल्डहुड न्यूमोनियाद्वारे (Global Coalition against Child Pneumonia) मुलांमध्ये, विशेषत: कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये न्यूमोनियामुळे होणारा उच्च मृत्यू दर कमी करण्यासाठी हा दिवस पाळण्यात आला.
जागतिक न्यूमोनिया दिन का साजरी करतात ?
जागतिक न्यूमोनिया दिन साजरी करण्यामागील उद्देश काय आहे ?
• न्यूमोनिया रोग, त्याची लक्षणे, लसीकरण, योग्य पोषण आणि न्यूमोनियाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छ हवेच्या उपक्रमांची अंमलबजावणी करणे या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करून जनजागृती करणे हा जागतिक न्यूमोनिया दिन' साजरा करण्याचा उद्देश आहे.
न्यूमोनिया म्हणजे काय ?
• न्यूमोनिया ही श्वसनाची गंभीर समस्या आहे, ज्यामध्ये फुफ्फुसात संसर्ग होतो.
• न्यूमोनियामुळे फुफ्फुस सुजतात.
• फुफ्फुसातील हवेच्या थैल्या ऍपोस्ट्रॉफी किंवा अल्व्होली द्रव किंवा पूने भरलेल्या असतात.
• न्यूमोनिया हा जीवाणू (Bacteria), विषाणू (Virus), किंवा बुरशीमुळे (Fungi) होतो.
• लहान मुलांमध्ये, 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढ व्यक्तींमध्ये आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांमध्ये न्यूमोनिया हा चिंताजनक होऊ शकतो.
न्यूमोनियाची लक्षणे कोणती ?
• श्वासोच्छवासात अडथळा निर्माण होणं.
• जोरजोरात आणि कमी श्वास घेणं
• हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढणं
• ताप, अंगात थंडी भरणं आणि खूप घाम येणं
• कफ, छातीत दुखणं, उलट्या होणं
• भूक न लागणे
• सांधे आणि स्नायू वेदना

न्यूमोनियाचा उपचार कसा करावा ?
• न्यूमोनियाचा उपचार हा न्यूमोनियाच्या प्रकारावर आणि केसच्या तीव्रतेवर अवलंबून असतो.
• सामान्य उपचारांमध्ये सर्व निर्धारित औषधे आणि लसीकरणे घेणे समाविष्ट आहे.
- प्रतिजैविक (Antibiotics) : जिवाणू न्यूमोनियासाठी.
- अँटीव्हायरल औषधे (Antiviral Medications) : व्हायरल न्यूमोनियासाठी.
- अँटीफंगल उपचार (Antifungal Treatments) : बुरशीजन्य न्यूमोनियासाठी.
जागतिक न्यूमोनिया दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• जागतिक न्यूमोनिया दिन 2025 साठीची थीम “Child Survival” आहे.
• ही थीम मुलांच्या आयुष्याच्या संरक्षणावर भर देते कारण न्यूमोनिया हे बालमृत्यूसाठीचे एक प्रमुख संसर्गजन्य कारण आहे.

















