
चालू घडामोडी | बुकर पुरस्कार 2025 | Booker Prize 2025

बुकर पुरस्कार 2025
Booker Prize 2025
Subject : GS - पुरस्कार - आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 चा बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या लेखकाला मिळाला ?
1. अरुंधती रॉय
2. अरविंद अडिगा
3. डेविड झले
4. समांथा हार्वे
उत्तर : डेविड झले (David Szalay)

बातमी काय ?
• 2025 चा बुकर पुरस्कार ब्रिटिश-हंगेरीयन लेखक डेविड झले यांना त्यांच्या सहाव्या कादंबरी फ्लेश (Flesh) साठी देण्यात आला आहे.
• “Flesh” ही कादंबरी एका गरीब हंगेरियन तरुणाच्या लंडनपर्यंतच्या प्रवासावर आधारित आहे.
• या कादंबरीत नियती, मेहनत, महत्त्वाकांक्षा आणि समाजातील विषमता यांचे वास्तव चित्रण केले आहे.
• “Flesh” ही कादंबरी आधुनिक काळातील मानवी संघर्ष आणि यशाचा अर्थ यावर प्रकाश टाकते.

बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
• इंग्रजीत लिहिलेल्या काल्पनिक कादंबरीसाठी हा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार आहे.
• याची स्थापना 1969 साली झाली.
• हा पुरस्कार युनायटेड किंगडम आणि आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या कादंबऱ्यांना दिला जातो.
• हे यापूर्वी फिक्शनसाठी बुकर पारितोषिक (1969-2001) आणि मॅन बुकर पुरस्कार (2002-2019) म्हणून ओळखले जात होते.
• विजेत्याला 50,000 पौंड तसेच शॉर्टलिस्टेड केलेल्या सहा लेखकांना प्रत्येकी 2,500 पौंड इतकी पुरस्कार रक्कम दिली जाते.
• बुकर प्राइज फाऊंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यांमधील नेमका फरक काय ?
• Booker Prize : बुकर पुरस्कार हा मूळ इंग्रजीत लिहिलेल्या कादंबरीसाठी दिला जातो.
• International Booker Prize : आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा इतर भाषेत लिहिलेल्या आणि इंग्रजीत भाषांतरित कादंबरीसाठी दिला जातो ; यात लेखक व अनुवाद करणारा या दोघांनाही इंटरनॅशनल बुकर पुरस्कार दिला जातो.
पहिला बुकर पुरस्कार जिंकणारा भारतीय कोण ?
• बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय लेखिका अरुंधती रॉय या होत्या.
• त्यांना 1997 मध्ये ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ' (The God of Small Things) या त्यांच्या कादंबरीसाठी बुकर पुरस्कार देण्यात आला होता.

2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला ?
• "हार्ट लॅम्प" (Heart Lamp) हा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार (International Booker Prize) जिंकणारा पहिला कन्नड भाषेतील ग्रंथ ठरला असून, भारतीय प्रादेशिक साहित्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो.
• लेखिका बानू मुश्ताक (Banu Mushtaq) लिखित लघुकथा संग्रह “हार्ट लॅम्प” याला 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे.
• या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर दीपा भास्थी (Deepa Bhasthi) यांनी केले आहे.


















