
चालू घडामोडी | जनजातीय गौरव दिवस | Janjatiya Gaurav Divas

जनजातीय गौरव दिवस
Janjatiya Gaurav Divas
Subject : GS - दिनविशेष, आधुनिक भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जनजातीय गौरव दिवस केव्हा साजरी करण्यात येतो ?
1. 5 नोव्हेंबर
2. 10 नोव्हेंबर
3. 15 नोव्हेंबर
4. 20 नोव्हेंबर
उत्तर : 15 नोव्हेंबर
जनजातीय गौरव दिवस का साजरी करतात ?
जनजातीय गौरव दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे ?
• महान आदिवासी नायक आणि स्वातंत्र्य सैनिक भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस देशभरात जनजातीय गौरव दिवस म्हणून उत्साहात साजरा केला जातो.
• संथाल, तामार, कोल, भील, खासी आणि मिझो यांसारख्या अनेक आदिवासी समुदायांनी विविध चळवळींद्वारे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले.
• भगवान बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा गौरव करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
पहिला जनजातीय गौरव दिवस केव्हा साजरी करण्यात आला ?
सन 2021 पासून, भारत सरकारने भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी 'आदिवासी गौरव दिन' साजरा करण्याची परंपरा सुरू केली आहे.
कोण होते भगवान बिरसा मुंडा ?
• भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडच्या उलिहातु गावात झाला.
• त्यांचे शिक्षण मिशनरी स्कूलमध्ये झाले
• आदिवासी समाजातील लोकांचे बळजबरीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनरी व इंग्रजांवर जननायक बिरसा मुंडा यांचा प्रचंड राग होता, त्यांनी मिशनरी स्कूल सोडून दिली.
• ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, जहागीरदार, सावकार इत्यादींनी आदिवासींचे प्रचंड शोषण केले होते.
उलगुलान क्रांती काय आहे ?
• बिरसा मुंडा यांनी 1899 रोजी जल , जंगल आणि जमिनीवर आदिवासींचा हक्क सांगून उलगुलान क्रांती सुरू केली.
• बिरसा मुंडा आणि त्यांचे अनुयायांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. त्यांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला.
• त्यांनी लोकांना स्वतःच्या जमिनीसाठी लढण्यास प्रेरित केले. याचे फलित म्हणून 1908 मध्ये छोटा नागपूर भाडेकरू कायदा मंजूर झाला. या कायद्याअंतर्गत आदिवासी लोकांकडून बिगर आदिवासी लोकांना जमीन हस्तांतरित करण्यास बंदी घातली गेली.
बिरसैत धर्माची स्थापना कोणी केली ?
• भगवान बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये एक नवीन धर्म - बिरसैत धर्म सुरू केला.
• आपल्या आदिवासी लोकांना जुन्या धार्मिक विश्वासांकडे परत जाण्याचे आवाहन तसेच मूळ आदिवासी संस्कृती जोपासण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
• पवित्रता, साधेपणा आणि सत्याचे पालन करण्यासाठी त्यांनी बिरसैत चळवळ सुरू केली.
• लोक त्यांना धरती अब्बा म्हणू लागली.
निधन : 9 जून 1900 रोजी जननायक बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.














![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)




