
चालू घडामोडी | जागतिक मधुमेह दिन 2025 | World Diabetes Day 2025

जागतिक मधुमेह दिन 2025
World Diabetes Day 2025
Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक मधुमेह दिन खालील पैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 1 नोव्हेंबर
2. 14 नोव्हेंबर
3. 30 नोव्हेंबर
4. 2 डिसेंबर
उत्तर : 14 नोव्हेंबर
जागतिक मधुमेह दिना बद्दल IMP वनलाईनर पॉईंट्स :
• दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो.
• मधुमेह, त्याचे प्रतिबंध आणि व्यवस्थापन याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी जागतिक मधुमेह दिन साजरा करण्यात येतो .
• जागरुकता मोहिमा, शैक्षणिक चर्चासत्रे, आरोग्य तपासणी आणि निधी उभारणी उपक्रम यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून का साजरी करतात ?
• 14 नोव्हेंबर हा सर फ्रेडरिख बँटिंग यांचा जन्मदिवस आहे.
• 1922 मध्ये सर फ्रेडरिख बँटिंग (Sir Frederick Banting) आणि चार्ल्स बेस्ट (Charles Best) यांनी इन्शुलीनचा शोध लावला.
• त्यांच्या या शोधामुळे मधुमेह असलेल्या लाखो लोकांचे जीवन बदलले आहे.


पहिला जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण (International Diabetes Federation) आणि जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation) यांनी 1991 मध्ये पहिल्यांदा जागतिक मधुमेह दिन साजरी केला.

मधुमेह म्हणजे नेमकं काय ?
What is Diabetes?
• मधुमेह हा चयापचयसंबंधित विकार आहे. हा आजार हळूहळू विकसित होतो.
• यामध्ये रक्तातील शर्करेमध्ये (ग्लूकोज) आवश्यकतेपेक्षा अधिक वाढ दिसून येते.
• मधुमेहाचे टाइप 1 मधुमेह अणि टाइप 2 मधुमेह असे दोन गटात वर्गीकरण करता येते.
• टाइप 1 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन तयार होत नाही किंवा याचे प्रमाण अगदी कमी असते.
• त्यामुळे टाइप 1 मधुमेहाच्या रुग्णाला बाहेरून इन्शुलिन घेणे अतिआवश्यक असते.
• टाइप-2 मधुमेहा मध्ये स्वादुपिंडाद्वारे तयार झालेले इन्शुलीन शरीरातील पेशींद्वारे योग्य प्रमाणात वापरले जात नाही.
• इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो तुमचे स्वादुपिंड (Pancreas) बनवतो जो रक्तातील साखरेची (ग्लूकोज) पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक आहे.
• दीर्घकालीन मधुमेहामुळे अंधत्व, हृदय विकार असे आजार उद्भवण्याची शक्यता असते.
• संतुलित आहार, नियमित शारीरिक व्यायाम, नियंत्रित वजन आणि धूम्रपान न करणे यांद्वारे मधुमेह या आजाराला प्रतिबंध घालता येतो.
जागतिक मधुमेह दिन 2025 ची संकल्पना (थीम) कोणती ?
What is the theme of World Diabetes Day 2025 ?
• "आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मधुमेह," (Diabetes Across Life Stages) ही जागतिक मधुमेह दिन 2025 ची थीम आहे.
• ही थीम सांगते की डायबेटीस असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकत्रित उपचार सेवा (Integrated Care), आधार देणारे वातावरण (Supportive Environments) आणि आरोग्य, सन्मान आणि स्वतःची काळजी घेण्यास (Self-Management) मदत करणाऱ्या धोरणांचा समान हक्क मिळायला हवा.



















