
चालू घडामोडी | रिफ्ट व्हॅली फिव्हर | Rift Valley Fever

रिफ्ट व्हॅली फिव्हर
Rift Valley Fever
Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) रिफ्ट व्हॅली फीवर खालील पैकी कोणत्या कारणामुळे होतो ?
1. जिवाणू
2. विषाणू
3. बुरशी
4. अमिबा
उत्तर : विषाणू
बातमी काय ?
• जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने मॉरिटानिया आणि सेनेगल या पश्चिम आफ्रिकी देशांत रिफ्ट व्हॅली फीवरचा प्रादुर्भाव झाल्याची पुष्टी केली आहे.
रिफ्ट व्हॅली तापा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• रिफ्ट व्हॅली फीवर हा एक विषाणूजन्य झुनोटिक आजार आहे जो प्राणी आणि मानव दोघांनाही प्रभावित करतो.
• रिफ्ट व्हॅली फीवर हा Phenuiviridae कुलातील फ्लेबोव्हायरस मुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे.
• रिफ्ट व्हॅली फीवर हा प्रामुख्याने मेंढ्या, बकरी, मवेशी, उंट यांसारख्या प्राण्यांत दिसणारा व्हायरल रोग आहे, पण काही वेळा माणसांतही पसरतो.
• मानवांमध्ये हा रोग प्रामुख्याने संक्रमित प्राण्यांच्या संपर्कातून किंवा संक्रमित मच्छरांच्या चाव्याने पसरतो.
• हा व्हायरस मानसा - मानसांत प्रसारित होत नाही, म्हणजेच संक्रमित व्यक्तिच्या थेट संपर्काने पसरत नाही.
रिफ्ट व्हॅली फीवर कसा पसरतो ?
• संक्रमित प्राण्यांच्या रक्त किंवा अवयवांच्या संपर्काने.
• संक्रमित मच्छरांच्या चाव्याने.
• मच्छरांच्या विविध प्रजाती हा व्हायरस पसरवतात आणि प्रत्येक प्रदेशात वाहक वेगळा असू शकतो.
रिफ्ट व्हॅली फीवर पहिल्यांदा कोठे उत्पत्ती कोठे आढळला ?
• रिफ्ट व्हॅली तापाची उत्पत्ती केनियाच्या रिफ्ट व्हॅली प्रदेशात झाली.
• या रोगाचे नाव केनिया देशा मधील “Rift Valley” प्रदेशावरून आले आहे. जिथे 1930 च्या दशकात हा रोग प्रथम आढळला.
• नंतर हा उप-सहारा आफ्रिकेत पसरला.
• 1977 मध्ये हा मिसर (इजिप्त) पर्यंत पोहोचला.
• 2000 मध्ये प्रथमच आफ्रिका खंडाबाहेर—सौदी अरेबिया व येमेन् येथे याचा प्रादुर्भाव दिसला.
रिफ्ट व्हॅली तापाचीचे लक्षणे कोणती ?
सामान्य (90% प्रकरणांत) :
• फ्लूसारखी लक्षणे
• 2–6 दिवसांनी ताप सुरू होणे
• स्नायू व सांधेदुखी
• डोकेदुखी, अशक्तपणा, पाठीचा त्रास
• कधी कधी उलटी, मळमळ, डोळे प्रकाशात न उघडणे
गंभीर प्रकरणांत :
• डोळे (Retinitis) प्रभावित
• मेंदूची सूज (Encephalitis)
• यकृताची समस्या (Hepatitis)
रिफ्ट व्हॅली फीवर वर उपचार उपलब्ध आहेत का ?
• रिफ्ट व्हॅली फीवर साठी सध्या विशिष्ट antiviral औषध उपलब्ध नाही.
• उपचार सहाय्यक (Supportive) असतात – म्हणजे ताप कमी करणे, द्रव्ये देणे, अवयवांना सपोर्ट देणे इत्यादी.
रिफ्ट व्हॅली फीवर साठी प्रतिबंध उपाय कोणते ?
• पशुधनाशी थेट संपर्क टाळणे
• मच्छर नियंत्रण व मच्छररोधकांचा वापर करणे
• संक्रमित भागात संरक्षणात्मक कपडे व हातमोजे
• जनावरांच्या मृतदेहांपासून लांब राहणे
रिफ्ट व्हॅली फीवर गंभीर का मानला जातो ?
• कृषी आणि पशुधन असलेल्या भागात हा रोग आर्थिक नुकसान करतो.
• मृत्यू दर कमी असला तरी गंभीर प्रकरणांत डोळे, मेंदू आणि यकृत यांना धोका असतो.
• मच्छरांची वाढ आणि पावसाळा वाढल्यास याचा प्रादुर्भाव वाढू शकतो.






















