
चालू घडामोडी | कुष्ठरोग शोध अभियान 2025 | Leprosy Research Campaign 2025

कुष्ठरोग शोध अभियान 2025
Leprosy Research Campaign 2025
Subject : GS - सरकारी योजना- उपक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) महाराष्ट्रात कुष्ठरोग शोध अभियान 2025 कोणत्या कालावधीत राबवले जात आहे ?
1. 1 ते 15 ऑक्टोबर
2. 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर
3. 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
4. 1 ते 31 डिसेंबर
उत्तर : 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
कुष्ठरोग शोध अभियान नेमकं काय आहे ?
• केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 दरम्यान राज्यभर कुष्ठरोग शोध अभियान राबवले जात आहे.
• या मोहिमेत घरोगरी सर्वेक्षण करून नवीन कुष्ठरोगी रुग्ण शोधले जातील आणि त्यांना त्वरित उपचार दिले जातील.
• कुष्ठरोगावरील उपचार पूर्णपणे मोफत आणि सरकारी आरोग्य यंत्रणेमार्फत उपलब्ध आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
• उद्दिष्ट : “2027 पर्यंत शून्य कुष्ठरोग प्रसार” या ध्येयाची पूर्तता.
कुष्ठरोग शोध अभियानाचा उद्देश कोणता ?
• घराघरांत जाऊन निदान न झालेले रुग्ण शोधणे, त्यांचा उपचार सुरू करणे आणि रोगाचा प्रसार थांबवणे.
• समाजात कुष्ठरोगाबाबत जनजागृती वाढवणे आणि लोकांना योग्य उपचाराची माहिती देणे.
कुष्ठरोग शोध अभियान कसे राबवले जात आहे ?
• सर्व जिल्ह्यांमध्ये व्यापक सर्वेक्षण करून लोकांची तपासणी करणे.
• संशयित रुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करणे.
• कुष्ठरोग निदान झाल्यास बहुविध औषधोपचार (MDT) त्वरित सुरू करणे.
• राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर समन्वय समित्या व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती :
• कुष्ठरोग उपचारयोग्य आहे आणि सरकारी रुग्णालयात उपचार मोफत मिळतात.
• लवकर उपचार घेतल्यास रोगाचा प्रसार थांबतो आणि अपंगत्व टाळता येते.
• नागरिकांनी तपासणीसाठी सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे.
महाराष्ट्र शासनाने कुष्ठरोग ‘Notifiable Disease’ का घोषित केला ?
• महाराष्ट्र शासनाने नुकतेच कुष्ठरोगाला Notifiable Disease (अनिवार्य नोंदणीचा रोग) घोषित केले आहे.
• याचा अर्थ — कोणत्याही डॉक्टरांनी किंवा आरोग्य संस्थांनी निदान झालेल्या रुग्णाची नोंद 2 आठवड्यांच्या आत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक आहे.
• यामुळे रुग्णांचे वेळीच उपचार, रोगाचे नियंत्रण आणि राज्यातील परिस्थितीवर अचूक देखरेख ठेवता येते.
2027 पर्यंत ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ या ध्येयासाठी हे अभियान का महत्त्वाचे ?
• निदान न झालेले रुग्ण सापडल्याने संसर्गाची साखळी तोडता येते.
• जास्तीचे रुग्ण लवकर सापडल्यास उपचार वेळेत सुरू होतात.
• राज्यभर एकसमान पद्धतीने जनजागृती वाढते आणि लोकांचा भीतीचा गैरसमज दूर होतो.
कुष्ठरोग कशामुळे होतो ?
• कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे.
• कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्रे या जिवाणूमुळे होतो.
• नाक आणि तोंडातून थेंबांद्वारे जिवाणू प्रसारित केले जातात.
• हस्तांदोलन करणे किंवा कुष्ठरोग झालेल्या व्यक्तीला मिठी मारणे, एकत्र जेवण करणे किंवा एकमेकांच्या शेजारी बसणे यासारख्या अनौपचारिक संपर्कातून हा रोग पसरत नाही.

कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला ?
• इ.स. 1873 मध्ये नॉर्वेतील वैद्य गेरहार्ट हेन्रिक आरमौअर हान्सेन (Gerhard Henrik Armauer Hansen) यांना प्रथम ऊतींच्या नमुन्यात कुष्ठरोगाचे जीवाणू आढळले.
• या जीवाणूंमुळे कुष्ठरोग होतो, असे त्यांनी इ.स. 1874 मध्ये सिद्ध केले.
• त्यांच्या या शोधामुळे कुष्ठरोगाला हान्सेन रोग (Hansen Disease) असेही म्हणतात.
























![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)

