
चालू घडामोडी | अंबाजी पांढरा संगमरवरला GI Tag | Ambaji White Marble gets GI Tag

अंबाजी पांढरा संगमरवरला GI Tag
Ambaji White Marble gets GI Tag
Subject : GS - GI Tag
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अंबाजी पांढरा संगमरवरला अलिकडेच GI Tag मिळाला तर हे संगमरवर कोणत्या राज्यातील खाणीत आढळते ?
1. राजस्थान
2. गुजरात
3. मध्यप्रदेश
4. कर्नाटक
उत्तर : गुजरात
बातमी काय ?
• अलिकडेच, केंद्र सरकारने अंबाजी पांढरा संगमरवर( Ambaji White Marble) ला GI Tag दिला आहे.
अंबाजी पांढरा संगमरवर( Ambaji White Marble) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथे अंबाजी पांढरा संगमरवर( Ambaji White Marble) मिळतो.
• हा संगमरवर धार्मिक स्थळांच्या बांधकामासाठी प्रसिद्ध असून अंबाजी मंदिरातही त्याचा वापर केला आहे.
• अंबाजीचा पांढरा संगमरवर अत्यंत पांढरा, थंड राहणारा, कठीण आणि चमकदार असल्यामुळे देशभरात लोकप्रिय आहे.
• GI Tag मिळाल्यामुळे स्थानिक कारागीर, उत्पादक आणि या प्रदेशातील अर्थव्यवस्थेला फायदा होणार आहे.

Ambaji White Marble चे – मुख्य वैशिष्ट्ये
• अंबाजी पांढरा संगमरवर मध्ये 95.8–96.3% पर्यंत पांढरेपणा असल्याने तो देशातील सर्वात अधिक शुभ्र संगमरवर मानला जातो.
• या संगमरवराचे दाणे अतिशय बारीक आणि एकसमान असल्यामुळे तो अत्यंत आकर्षक दिसतो.
• अंबाजी पांढरा संगमरवर थोडासा पारदर्शक आहे, त्यावर उच्च दर्जाचा पॉलिश करता येतो आणि तो इतर संगमरवरांच्या तुलनेत जास्त कठीण आहे.
• त्याच्या कठोरतेमुळे जुने कारागीर देवळांतील सूक्ष्म शिल्पकाम अतिशय बारकाईने करू शकत होते.
• काशी विश्वनाथ कॉरिडॉर, नवीन संसद भवन यांसारख्या मोठ्या प्रकल्पांत या संगमरवरचा वापर झाला आहे.
अंबाजी मार्बल का प्रसिद्ध आहे ?
• गरम सूर्यप्रकाशातही तो थंड राहतो, त्यामुळे मंदिरांसाठी अत्यंत योग्य.
• मध्ययुगापासून अंबाजी येथे संगमरवर खाणकाम सुरू आहे.
• जैन मंदिरांतील सूक्ष्म शिल्प हे अंबाजी येथील पांढऱ्या संगमरवराच्या कठोरतेमुळे शक्य झाले.
अंबाजी पांढरा संगमरवर ला GI Tag मिळाल्याचे फायदे कोणते ?
• इतर कोणी बनावट नावाने संगमरवर विकू शकत नाही — यामुळे कारागीर आणि उत्पादकांचे हक्क सुरक्षित होतात.
• GI Tag हा त्या प्रदेशातील उत्पन्न, रोजगार आणि प्रसिद्धी वाढवतो.
भौगोलिक संकेतांक म्हणजे काय ?
GI टॅग कोणाला देण्यात येतो ?
• GI Tag चा फूल फॅार्म Geographical Indication असा आहे.
• एखाद्या भागातील वस्तू किंवा पदार्थ ही त्या भागाचं वैशिष्ट्य असल्यास त्यास भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग देण्यात येतो.
• Geographical Indication of goods (Registration and Protection) Act, 1999 हा कायदा भारतातील वस्तूंची संबंधित भौगोलिक संकेतांची नोंदणी आणि उत्तम संरक्षण करण्यास प्रयत्न करतो.
GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन कोणते ?
• 2004 मध्ये दार्जिलिंग टी (दार्जिलिंग चहा) GI टॅग मिळवणारे पहिले भारतीय उत्पादन होते.



























![[ karkrogachi pramukh lakshane, vegane vajan kami hone, satyatane yenara khokla, raktasarav, raktachya gathi hone, potat dukhne, kayam thakva janavane, वेगाने वजन कमी होणे, सातत्याने येणारा खोकला, रक्तस्त्राव, रक्ताच्या गाठी येणे, कायम थकवा जाणवने, पोटात दुखणे इत्यादी. ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Cancer_Symptomps_1731313743199.webp)
![[ sthanacha karkrog, breast cancer, tondacha karkrog, mouth cancer, ghasyacha karkrog, throat cancer, fufusyacha karkrog, lung cancer ]](https://dw44bia1z0v5t.cloudfront.net/current_affairs_images/Types_of_Cancer_1731313683225.webp)