
चालू घडामोडी | भारताचे 94 वे रामसर स्थळ कोणते ? | Which is the 94th Ramsar site of India ?

भारताचे 94 वे रामसर स्थळ कोणते ?
Which is the 94th Ramsar Site of India ?
Subject : GS - पर्यावरण - रामसर स्थळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताचे 94 वे रामसर स्थळ म्हणून कोणते सरोवर घोषित केले ?
1. लोकताक सरोवर
2. लोणार सरोवर
3. गोगाबील सरोवर
4. उदयपूर सरोवर
उत्तर : गोगाबील सरोवर (Gogabeel Lake)
बातमी काय ?
• बिहारमधील कटिहार जिल्यातील गोगाबील सरोवर याला भारताचे 94 वे रामसर स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे.
गोगाबील सरोवर कोठे आहे ?
• हे बिहारमधील कटिहारमध्ये गंगा आणि महानंदा नद्यांच्या दरम्यान असलेले नैसर्गिक सरोवर आहे.
• हे बिहारचे पहिले सामुदायिक अभयारण्य असून त्याचे व्यवस्थापन स्थानिक लोक आणि वन विभाग एकत्रितपणे करतात.
• पुराच्या काळात गोगाबील सरोवर दोन्ही नद्यांशी जोडते, त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह टिकून राहतो.

गोगाबील सरोवर इतके महत्त्वाचे का आहे ?
1) जल विज्ञान (Hydrology) :
• पुराच्या वेळी गंगा आणि महानंदा नद्यांमधून पाणी गोगाबीलमध्ये भरते.
• त्यामुळे हा भाग नैसर्गिकरित्या पूर नियंत्रण करतो.
• मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने भूजल पुनर्भरण (Groundwater Recharge) वेगाने होते.
• नदी व आर्द्रभूमी यांच्यातील हा नैसर्गिक संपर्क परिसराचा जलसंतुलन टिकवून ठेवतो.
2) स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचे ठिकाण :
• थंड प्रदेशातून हिवाळ्यात येणाऱ्या शेकडो Migratory Birds यांचा थांबा येथे असतो.
• इथे त्यांना सुरक्षित पाणी, खाद्य आणि विश्रांतीची जागा मिळते.
3) जलीय वनस्पतींचे संरक्षण (Aquatic Plants) :
• गोगाबीलमध्ये विविध प्रकारच्या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती वाढतात.
• या वनस्पती पाण्यातील ऑक्सिजन वाढवतात आणि
• मासे, बेडूक, पाण्यातील कीटक यांना लपण्यासाठी व वाढण्यासाठी घरासारखे वातावरण देतात.
• यामुळे संपूर्ण आर्द्रभूमीचे आरोग्य चांगले राहते.
4) मत्स्यपालन (Fisheries) :
• गोगाबीलचे पाणी स्वच्छ आणि वनस्पती युक्त असल्यामुळे येथे माशांची संख्या जास्त असते.
• स्थानिक लोक इथून मासेमारी करून आपली उपजीविका चालवतात.
• आर्द्रभूमीमुळे माशांना अन्न, सावली आणि प्रजननासाठी जागा मिळते.
5) जैवविविधता संरक्षण (Biodiversity) :
• इथे पक्षी, मासे, साप, कीटक, वनस्पती अशा अनेक जीवांची एकत्रित जैवविविधता आढळते.
• या सर्व जीवांमुळे नैसर्गिक अन्नसाखळी (Food Chain) आणि अन्नजाळे (Food Web) मजबूत राहतात.
• गोगाबील सारख्या आर्द्रभूमी हवामान संतुलन आणि पर्यावरण स्थिरता राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
6) सामाजिक-आर्थिक फायदे :
• स्थानिक लोकांसाठी मत्स्यन (Fishing) हा मोठा रोजगार स्रोत आहे.
• इको-टुरिझममुळे (Bird Watching, Nature Tourism) उत्पन्न वाढते.
• बाढ नियंत्रण आणि भूजल पुनर्भरणामुळे शेती सुरक्षित राहते.
• हवामान बदलांशी सामना करण्यासाठी ही आर्द्रभूमी नैसर्गिक संरक्षण कवचासारखी मदत करते.
रामसर ठराव म्हणजे काय ?
रामसर स्थळ म्हणजे काय ?
• इराण मधील रामसर या शहरात 2 फेब्रुवारी 1971 रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते.
• या ठरावा अंतर्गत पाणथळ जागांचे संरक्षण करण्यासाठी एखादे क्षेत्र रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात येते.
• हा ठराव 1975 सालापासून अंमलात आला.
• भारताने हा करार 1 फेब्रुवारी 1982 रोजी स्वीकारला.
• स्थानिक आणि राष्ट्रीय कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने सर्व पाणथळ जागांचे संवर्धन आणि विवेकी वापर करणे आणि त्यायोगे जगाचा शाश्वत विकास साधणे हे रामसर परिषदेचे मिशन आहे.
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न - उत्तरे
प्रश्न) भारतात किती रामसर स्थळे आहेत ?
उत्तर : 94 ( नोव्हेंबर 2025 पर्यंत)
प्रश्न) भारतात सर्वात जास्त रामसर स्थळे कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : तामिळनाडू
तामिळनाडूमध्ये 20 रामसर स्थळे आहेत. (नोव्हेंबर 2025 पर्यंत)
प्रश्न) महाराष्ट्रात किती रामसर स्थळे आहेत ?
1. 3
2. 5
3. 7
4. 9
उत्तर : 3
1. लोणार सरोवर
2. नांदूर मध्यमेश्वर
3. ठाणे खाडी



























