
चालू घडामोडी | 'अजेय वॉरियर-25’ | AJEYA WARRIOR-25

'अजेय वॉरियर-25’
AJEYA WARRIOR-25
Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'अजेय वॉरियर’ हा कोणत्या दोन देशांमधील सैन्य सराव आहे ?
1. भारत–फ्रान्स
2. भारत–युनायटेड किंगडम
3. भारत–जपान
4. भारत–अमेरिका
उत्तर : भारत–युनायटेड किंगडम
बातमी काय ?
• राजस्थानातील महाजन फील्ड फायरिंग रेंजेस येथे AJEYA WARRIOR-25 या भारत–युनायटेड किंगडम लष्करी सरावाच्या आठव्या संस्करणाला सुरुवात झाली.
'अजेय वॉरियर’ कोणत्या दोन देशांमध्ये होतो ? त्याची सुरुवात केव्हा झाली ?
• भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यात होणारा द्विपक्षीय लष्करी सराव.
• 2011 पासून दर 2 वर्षांनी (Biennially) आयोजित होतो आणि दोन्ही सैन्यांतील प्रमुख सहकार्य उपक्रमांपैकी एक मानला जातो.
'अजेय वॉरियर-25’ युद्ध सरावा बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
1) 14 दिवसांचा संयुक्त सराव :
• सराव 17 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत होणार असून, एकूण 240 जवान सहभागी आहेत.
• यात भारतीय आणि ब्रिटिश सेना समसमान प्रतिनिधित्वासह भाग घेतील.
2) भारतीय सेनेचे प्रतिनिधित्व :
• भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व शीख रेजिमेंटचे जवान करत आहेत, जे कठीण मोहिमांसाठी ओळखले जातात.
3) संयुक्त राष्ट्रांच्या आदेशानुसार काउंटर :
• सराव UN मँडेटखाली असून, निमशहरी (Semi-Urban) भागातील दहशतवादविरोधी कारवाया हा त्याचा मुख्य विषय आहे.
4) संयुक्त नियोजन आणि तांत्रिक प्रशिक्षण :
• ब्रिगेड स्तरावरील मिशन प्लॅनिंग, एकात्मिक तंत्रसराव, सिम्युलेशन-आधारित परिस्थिती आणि कंपनी-स्तरावरील फील्ड प्रशिक्षण दिले जाते.
5) सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण :
• दोन्ही सैन्य जटिल परिस्थितीत कसे संयुक्त प्रतिसाद देतात, तांत्रिक कौशल्ये कशी सुधारतात यावर एकमेकांकडून शिकतात.
सरावाचे महत्त्व (Significance) :
• भारत–यूके सैन्य सहकार्य अधिक मजबूत होते.
• दहशतवादविरोधी जटिल परिस्थितीत एकत्रितपणे काम करण्याची क्षमता वाढते.
• 2025 चे संस्करण व्यावसायिकता, सहकार्य, जागतिक शांतता आणि प्रादेशिक स्थैर्य यांना अधिक बळकटी देते.


















