
चालू घडामोडी | रुद्रा ब्रिगेड काय आहे ? | What is the Rudra Brigade?

रुद्रा ब्रिगेड काय आहे ?
What is the Rudra Brigade?
Subject : GS - संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय सेनेची रुद्रा ब्रिगेड (Rudra Brigade) कोणत्या प्रकारच्या युद्धासाठी तयार केली आहे ?
1. फक्त सागरी युद्ध
2. फक्त पर्वतीय युद्ध
3. जमीन, हवा आणि सायबर युद्ध
4. फक्त वाळवंटी युद्ध
उत्तर : जमीन, हवा आणि सायबर युद्ध
बातमी काय ?
• भारतीय सेनेची Rudra Brigade ‘त्रिशूल’ आणि ‘अखंड प्रहार’ सरावांमध्ये यशस्वीपणे तपासली गेली असून, याचबरोबर भारताने Cold Strike Doctrine लागू करण्याची तयारी दाखवली.
रुद्रा ब्रिगेड म्हणजे काय ?
What is the Rudra Brigade?
• रुद्रा ब्रिगेड ही भारतीय सेनेची आधुनिक युद्धासाठी सक्षम ब्रिगेड आहे.
• ही भारतीय सेनेची एकत्रित लढाऊ ब्रिगेड आहे, ज्यात पायदळ, रणगाडे, तोफखाना, हवाई संरक्षण, इंजिनिअर्स, सिग्नल्स आणि ड्रोन हे सर्व एकाच कमांडखाली काम करतात.
• म्हणजे युद्धात लागणारे सर्व दल एकत्र काम करणारी कायमस्वरूपी टीम.
• जमीन, हवा आणि सायबर या तिन्ही क्षेत्रांचा एकत्र वापर भारतीय सेनाला अधिक चपळ, सक्षम आणि तंत्रज्ञान आधारित बनवतो.
• भारतीय सेना विविध Corps Commands अंतर्गत रुद्रा ब्रिगेड चालवते.
• उत्तरेकडील सीमेवर पूर्व लडाख आणि सिक्कीम येथे रुद्रा ब्रिगेडच्या दोन ब्रिगेड आधीच तैनात आहेत.
रुद्रा ब्रिगेडची सरावातील कामगिरी :
• ‘अखंड प्रहार’ सरावात या ब्रिगेडने अत्यंत अचूक आणि समन्वित हालचाली करून आपली तयारी सिद्ध केली.
• अनेक दिशांनी येणाऱ्या धोक्यांना जलद प्रतिसाद देण्याची क्षमता दाखवली.
रुद्रा ब्रिगेड चे मुख्य वैशिष्ट्ये कोणते ?
बहुआयामी कारवाई क्षमता ( Multi-Domain Operations) :
• ही ब्रिगेड जमीन, हवा आणि सायबर—तिन्ही आघाड्यांवर एकाच वेळी कारवाई करू शकते.
• त्यामुळे युद्ध अधिक वेगवान आणि अचूक होते.
त्वरित तैनाती (Rapid Mobilisation) :
• सर्व युनिट्स आधीपासूनच एकत्र असल्याने सैन्याला कधीही त्वरित हालचाल करता येते.
• पूर्वीसारखी वेगवेगळ्या ठिकाणांहून दल गोळा करण्याची गरज नाही.
बदलत्या भूभागानुसार रचना (Modular Structure) :
• वाळवंट, पर्वत किंवा मैदानी भाग—ज्या प्रदेशात ऑपरेशन असेल त्यानुसार ब्रिगेडचा आकार आणि रचना परिस्थीतीनुसार बदलता येते.
• त्यामुळे कोणत्याही भूभागात ऑपरेशन सहज पार पाडता येते.
शक्ती-वर्धक प्रणाली (Force Multipliers) :
ड्रोन, ISR सिस्टम, आर्टिलरी आणि हेलिकॉप्टर समर्थनामुळे ब्रिगेडची क्षमता अनेकपटीने वाढते आणि आक्रमण अधिक अचूक होते.
सीमावर्ती परिस्थितीत त्वरित प्रतिसाद (Quick Response in Border Situations) :
• पाकिस्तानच्या उकसवणुकीला किंवा चीनच्या अचानक वाढलेल्या हालचालींना ताबडतोब प्रत्युत्तर देता येते.


















