
चालू घडामोडी | जागतिक मत्स्यव्यवसाय दिन | World Fisheries Day

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन
World Fisheries Day
Subject : GS - दिनविशेष
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन कधी साजरा केला जातो ?
1. 1 जून
2. 14 सप्टेंबर
3. 21 नोव्हेंबर
4. 4 डिसेंबर
उत्तर : 21 नोव्हेंबर
बातमी काय ?
• भारताने 21 नोव्हेंबर रोजी जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 2025 साजरा केला, ज्यामध्ये शाश्वतता, निळी-अर्थव्यवस्था वाढ आणि मच्छीमारांसाठी सुधारित उपजीविका साजरी केली गेली.
• भारताच्या मत्स्यव्यवसाय आणि मत्स्यपालन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा म्हणून, विभागाने मत्स्यव्यवसाय आणि जलशेती मधील मागोवा काढण्याची क्षमता यावरील " राष्ट्रीय आराखडा 2025" प्रसिद्ध केला

जागतिक मत्स्यव्यवसाय दिन दिवसाची सुरुवात केव्हा आणि कोठून झाली ?
• 1997 मध्ये दिल्लीमध्ये 18 देशांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन World Fisheries Forum स्थापन केला, त्यातूनच जागतिक मत्स्यव्यवसाय दिन या दिवसाची सुरुवात झाली.
• जागतिक मत्स्यव्यवसाय दिन हा दिवस जगभरात मासेमारी, समुद्री संसाधन संरक्षण आणि मच्छीमारांच्या कल्याणासाठी जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो
जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 2025 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• "भारताचे नील परिवर्तन: सागरी खाद्य निर्यातीत मूल्यवर्धन मजबूत करणे"
• “India’s Blue Transformation: Strengthening Value Addition in Seafood Exports.” ही जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 2025 ची थीम आहे.

मत्स्यपालन आणि जलशेतीमधील मागोवा काढण्याची क्षमता यावरील राष्ट्रीय आराखडा 2025 उद्देश काोणता ?
• यावरील राष्ट्रीय आराखडा 2025 चा उद्देश अन्न सुरक्षा, शाश्वतता आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश वाढवणारी राष्ट्रीय डिजिटल ट्रेसेबिलिटी प्रणाली स्थापित करणे हा आहे.
भारताची मासे उत्पादनातील प्रगती :
• देशाचे मासे उत्पादन 2013–14 मधील 96 लाख टनांवरून 2024–25 मध्ये 195 लाख टनांपर्यंत वाढले, म्हणजेच दुपटीपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली.
• समुद्री उत्पादनांची निर्यातही सुधारली असून US$ 0.81 बिलियन (Oct 2024) वरून US$ 0.90 बिलियन (Oct 2025) पर्यंत वाढ झाली, म्हणजेच 11.08% वाढ.
• भारत आज जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मासे उत्पादक आणि जगातील पहिला श्रिम्प उत्पादक देश आहे.










