
चालू घडामोडी | ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ मोहीम | “Hamara Shauchalaya, Hamara Bhavishya” Campaign

‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ मोहीम
“Hamara Shauchalaya, Hamara Bhavishya” Campaign
Subject : GS - सरकारी योजना- उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ या मोहीम खालील पैकी कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे ?
1. 2 ऑक्टोंबर ते 31 डिसेंबर
2. 2 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर
3. 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
4. 1 डिसेंबर ते 26 जानेवारी
उत्तर : 19 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर
बातमी काय ?
• जल शक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाने (Department of Drinking Water and Sanitation) जागतिक शौचालय दिन 2025 रोजी ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ ही देशव्यापी मोहीम सुरू केली.
‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ या मोहीमे बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य हा राष्ट्रव्यापी उपक्रम 19 नोव्हेंबर 2025 पासून 10 डिसेंबर 2025 पर्यंत सुरु राहणार.
• हमारा शौचालय, हमारा भविष्य ही मोहीम, स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी शौचालयांचे महत्त्व आणि आजच्या समुदायासाठी सुरक्षित आणि स्वच्छ शौचालयांची सेवा पुरवण्यासाठी त्यांच्या योग्य देखभालीचे महत्त्व अधोरेखित करते.
• स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गौरव आणि पात्र लाभार्थ्यांना व्यक्तिगत घरगुती शौचालय (IHHL) मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात येईल.
• ‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ ही मोहीम स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे.
‘हमारा शौचालय, हमारा भविष्य’ या मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे कोणती ?
• सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरांमधील वैयक्तिक शौचालयांच्या कार्यक्षमतेत वृद्धी करुन त्यांची दुरुस्ती करणे.
• सामुदायिक शौचालयांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कार्य आणि देखभाल प्रणालींचे मूल्यांकन आणि बळकटीकरण करणे.
• सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच घरांमधील वैयक्तिक शौचालयांचे आधुनिक पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यासाठी समुदायांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे.
समुदाय तसेच विशेषतः शाळांमध्ये खालील गोष्टींविषयी जागरूकता निर्माण करणे :
• व्यक्ती, समाज आणि देशासाठी स्वच्छता आणि स्वच्छताविषयक सवयींचे महत्व.
• मलमूत्र व्यवस्थापनासाठी सुरक्षित हाताळणी, तसेच रेट्रोफिटिंग म्हणजे जुनी व्यवस्था सुधारून सुरक्षित बनवणे आणि समुदाय स्तरावरील फेकल स्लज मॅनेजमेंट अर्थात संकलन, साठवण, वाहतूक, प्रक्रिया आणि सुरक्षित निपटारा/पुनर्वापर.
• हवामान लवचिक स्वच्छता आणि सेवा वितरण प्रोटोकॉल.










