
चालू घडामोडी | Project Gaja-Lok | ‘गज-लोक’ प्रकल्प

Project Gaja-Lok
‘गज-लोक’ प्रकल्प
Subject : GS - पर्यावरण, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘गज-लोक’ हा प्रकल्प कोणत्या संस्थेने सुरू केला आहे ?
1. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI)
2. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO)
3. भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था (INTACH)
4. वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (WWF)
उत्तर : भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था (INTACH)
बातमी काय ?
• INTACH आशियातील हत्तींच्या सांस्कृतिक-पर्यावरणीय वारशाचा अभ्यास करणारा ‘गज-लोक’ हा अभिनव प्रकल्प सुरू करत आहे.
प्रोजेक्ट ‘गज- लोक’ काय आहे ? आणि तो कोणी सुरू केला ?
• INTACH चा फूल फॅार्म Indian National Trust for Art and Cultural Heritage असा आहे.
• Indian National Trust for Art and Cultural Heritage म्हणजे भारतीय राष्ट्रीय कला आणि सांस्कृतिक वारसा संस्था
• INTACH ने सुरू केलेला प्रोजेक्ट ‘गज- लोक’ हा एक ट्रान्सनॅशनल कल्चर- नेचर प्रोग्राम (Transnational Culture-Nature Programme) म्हणजेच अनेक देशांना जोडणारा प्रकल्प आहे.
• यात आशियाई हत्तींचे इतिहास, संस्कृती, पारंपरिक प्रतीक, पर्यावरणीय आणि हवामान-लवचिकता या सर्वांचा एकत्रित अभ्यास केला जाणार आहे.
प्रोजेक्ट ‘गज- लोक’ प्रकल्पाचा उद्देश काय ?
• आशियातील हत्ती असलेल्या देशांमधील सांस्कृतिक नाती आणि समान वारसा शोधणे.
• हत्तींचे पर्यावरणीय महत्त्व, हवामान बदलातील भूमिका आणि सांस्कृतिक सातत्य यावर प्रकाश टाकणे.

प्रोजेक्ट ‘गज- लोक’ प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती ?
बहु-देशीय अभ्यास :
• हत्तींचा आशियाई संस्कृतींवर हजारो वर्षांचा प्रभाव आहे.
• आशिया खंडातील विविध संस्कृतींमध्ये हत्तींची भूमिका आणि प्रतीकात्मक स्थानाचा तुलनात्मक अभ्यास करणे.
सांस्कृतिक वारशाचे दस्तावेजीकरण :
• मंदिर शिल्पे, मूर्ती, ग्रंथ, राजदरबारातील कला, लोकपरंपरा – या सर्वांमधील हत्तींचे चित्रण प्रदर्शित करणे
• उदाहरणार्थ : सिंधु खोरे सील, भरहुत रेलिंग, कोणार्क, ग्वालियर किल्ला, थायलंड-कंबोडियातील शिल्पे यांचे प्रदर्शन भरवणे.
इतिहास आणि आध्यात्मिकतेचा संगम :
• बौद्ध, जैन, हिंदू आणि दक्षिण-पूर्व आशियाई परंपरांतील हत्तींचे आध्यात्मिक भूमिकेचे विश्लेषण करणे.
हत्तींचे पर्यावरणीय आणि हवामान महत्त्व :
• हत्ती हा Ecological Balance राखणारा महत्त्वाचा घटक असून जंगलांचे पुनरुत्पादन, बियांचे प्रसारण यामध्ये हत्तींची थेट भूमिका आहे
हवामान बदलामुळे हत्तींवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करणे.
मानव-हत्ती संबंधांचा अभ्यास :
• मानव-हत्ती संघर्ष, सहअस्तित्व, संवर्धन नैतिकता आणि आधुनिक पर्यावरणीय आव्हानांवर चर्चा आणि अभ्यास करणे.
INTACH बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• INTACH चा फूल फॅार्म : Indian National Trust for Art and Cultural Heritage
• स्थापना : 1984
• मुख्यालय : नवी दिल्ली (New Delhi)
• स्वरूप : Non-Profit Organization
मुख्य उद्देश :
• भारतातील नैसर्गिक, सांस्कृतिक, सजीव, मूर्त व अमूर्त वारसा जपण्यासाठी कार्यरत.
• भारतातील सर्वात मोठे सदस्यत्व असलेले वारसा संवर्धन नेटवर्क.
• ऐतिहासिक इमारती, मंदिरे, किल्ले, प्राचीन वस्तू, पुरातत्व क्षेत्रे जपणे.
• कला, शिल्प, लोकपरंपरा, सांस्कृतिक दस्तावेजीकरण, ग्रंथ व हस्तलिखितांचे संवर्धन.
• शहर नियोजन, हेरिटेज वॉक, संशोधन व जागरूकता उपक्रम राबवणे.
आंतरराष्ट्रीय सहकार्य :
• UNESCO सहित अनेक जागतिक संस्थांसोबत भागीदारी.
• सांस्कृतिक संरक्षण प्रकल्प, प्रशिक्षण आणि संशोधनाचा आंतरराष्ट्रीय विस्तार.
















