
चालू घडामोडी | Colombo Security Conclave | कोलंबो सुरक्षा परिषद

कोलंबो सुरक्षा परिषद
Colombo Security Conclave
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच कोलंबो सुरक्षा परिषदेची 7 वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती ?
1. ढाका
2. नवी दिल्ली
3. कोलंबो
4. माले
उत्तर : नवी दिल्ली
बातमी काय ?
• कोलंबो सुरक्षा परिषदेची 7वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser) पातळीची बैठक नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.
• जिथे सेशेल्सचा सहावा पूर्ण सदस्य म्हणून समावेश करण्यात आला, ज्यामुळे या गटाचा महत्त्वपूर्ण विस्तार झाला आणि हिंद महासागर क्षेत्राचे रक्षण करण्यात त्याची भूमिका बळकट झाली.

कोलंबो सुरक्षा परिषदेची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• स्थापना : कोलंबो सुरक्षा परिषदेची स्थापना 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि मालदीव या तीन देशांनी सागरी सुरक्षा गट म्हणून करण्यात आली होती.
• पुढे 2022 मध्ये मॉरिशस हा चौथा देश या सुरक्षा परिषदेचा सदस्य बनला.
• 2024 मध्ये बांग्लादेश हा पाचवा आणि आता 2025 मध्ये सेशेल्स सहावा पूर्ण सदस्य देश म्हणून सहभागी झाला.
कोलंबो सुरक्षा परिषदेबद्दल थोडक्यात माहिती :
• कोलंबो सुरक्षा संवाद हा हिंदी महासागरातील देशांचा सुरक्षा संदर्भासाठीचा गट आहे.
• प्रादेशिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी एकमेकांना सहकार्याची प्रमुख क्षेत्रे ओळखली गेली ती पुढीलप्रमाणे :
1. सागरी सुरक्षा आणि संरक्षण
2. दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करणे.
3. तस्करी आणि आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीचा सामना करणे.
4. सायबर सुरक्षा, गंभीर पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचे संरक्षण करणे.
5. मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण कार्य करणे.
कोलंबो सुरक्षा परिषदेत सदस्य देश किती आणि कोणते ?
• कोलंबो सुरक्षा परिषदेत एकूण 6 सदस्य देश आहेत - भारत, श्रीलंका, मालदीव, मॉरिशस, बांग्लादेश आणि सेशेल्स (Seychelles)















