
चालू घडामोडी | Bharat NCAP 2.0 म्हणजे काय ?
Bharat NCAP 2.0 म्हणजे काय ?
Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) Bharat NCAP 2.0 मसुदा कोणत्या मंत्रालयाने जारी केला आहे ?
1. गृहमंत्रालय
2. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय
3. वित्त मंत्रालय
4. उद्योग मंत्रालय
उत्तर : रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय
बातमी काय ?
• केंद्र सरकारने भारतातील कारची सुरक्षा मानके वाढवण्यासाठी आणि ग्राहकांना वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक स्पष्ट माहिती देण्यासाठी 'भारत NCAP 2.0' आणण्याची तयारी सुरू केली आहे.
Bharat NCAP 2.0 म्हणजे काय ?
• Bharat NCAP चा फूल फॅार्म Bharat New Car Assessment Programme असा आहे.
• Bharat NCAP 2.0 हा भारतात विकल्या जाणाऱ्या कारची सुरक्षा, क्रॅश-क्षमता आणि सुरक्षा तंत्रज्ञान तपासणारे अद्ययावत रेटिंग कार्यक्रम आहे.
• Bharat NCAP 2.0 हे 2023 च्या Bharat NCAP तत्त्वांचे सुधारित रूप आहे.
• यात नवीन क्रॅश चाचण्या आणि अतिरिक्त सुरक्षा मूल्यांकन विभागांचा समावेश आहे.
• या कार्यक्रमाचे परीक्षण आणि प्रमाणन Central Institute of Road Transport (CIRT) पुणे येथे केले जाते.
Bharat NCAP 2.0 हा मसुदा कोणी जारी केला ?
• Bharat NCAP 2.0 हा मसुदा रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) जारी केला.
• भारतातील वाहन सुरक्षा मानकांना जागतिक स्तरावर नेण्यासाठी नवीन चाचण्या, उच्च सुरक्षा निकष आणि अतिरिक्त मूल्यांकन विभागांचा यात समावेश करण्यात आला आहे.
Bharat NCAP 2.0 चे उद्दिष्टे कोणते ?
• भारतातील वाहन सुरक्षा चौकट जागतिक मानकांपर्यंत अपडेट करणे.
• वाहनातील प्रवासी तसेच पादचारी आणि इतर असुरक्षित रस्ते वापरकर्त्यांचे संरक्षण वाढवणे.
• वाहन निर्मात्यांना अधिक प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे.
Bharat NCAP 2.0 चे मुख्य वैशिष्ट्ये (Key Features) कोणते ?
5 मूल्यमापन विभाग (Assessment Verticals) :
1. सुरक्षित ड्रायव्हिंग (Safe Driving)
2. अपघात टाळणे (Accident Avoidance)
3. क्रॅश प्रोटेक्शन (Crash protection)
4. असुरक्षित रस्ता वापरकर्त्यांचे संरक्षण (Vulnerable Road User Protection)
5. अपघातानंतरची सुरक्षा (Post-Crash Safety)
नवीन स्टार रेटिंग प्रणाली :
• Bharat NCAP 2.0 यात 5-स्टार रेटिंग साठी गुणांची मर्यादा वाढवली आहे.
• कोणत्याही विभागात शून्य गुण किंवा गंभीर इजा आढळल्यास 5-स्टार रेटिंग नसेल.
Bharat NCAP महत्त्व (Significance) काय ?
• भारताला जागतिक NCAP मानकांच्या अधिक जवळ आणते.
• भारतातील रस्ता अपघातांमध्ये 20% पेक्षा जास्त मृत्यू पादचाऱ्यांचे असल्याने त्यांचे संरक्षण मोठ्या प्रमाणात वाढेल.
• 2030 पर्यंत रस्ता मृत्यू 50% ने कमी करण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला मोठी मदत होईल.















