
चालू घडामोडी | हेयली गुबी ज्वालामुखीचा उद्रेक | Hayli Gubbi Volcano

हेयली गुबी ज्वालामुखीचा उद्रेक
Hayli Gubbi Volcano
Subject : GS - भूगोल - ज्वालामुखी
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) नुकताच हेयली गुबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर हा ज्वालामुखी कोणत्या प्रकारचा आहे ?
1. सक्रिय (Active)
2. सुप्त (Dormant)
3. मृत (Extinct)
4. संमिश्रित (Mixed)
उत्तर : सुप्त (Dormant)
बातमी काय ?
• आफ्रिका खंडातल्या इथिओपिया देशात हेयली गुबी ज्वालामुखी (Hayli Gubbi volcano) या सुप्त ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेला राखेचा विशाल ढग वाऱ्यांच्या वेगामुळे भारताच्या उत्तर-पश्चिम भागांपर्यंत पोहोचला.
• यामुळे दिल्ली-NCR, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि पंजाब या प्रदेशांतील हवाई उड्डाणांत काही तास अडथळे निर्माण झाले.
हेयली गुबी ज्वालामुखी बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हा ज्वालामुखी इथिओपियाच्या अफार प्रदेशात (Afar Region) स्थित आहे.
• हा एक सुप्त (Dormant) ज्वालामुखी असून जवळपास 10,000 ते 12,000 वर्षांनंतर पहिल्यांदा उद्रेक झाला.
• हा प्रदेश पूर्व आफ्रिका रिफ्ट प्रणाली (Eastern Africa Rift System) चा भाग आहे.
इथिओपियाचा प्रदेश भूकंपीयदृष्ट्या सक्रिय का ?
• अफार प्रदेश हा Eastern African Rift Valley चा सर्वात सक्रिय भागांपैकी एक आहे.
• येथे टेक्टॉनिक प्लेट्स वेगळ्या होत असल्याने पृथ्वीचा पृष्ठभाग सतत हलतो.
• त्यामुळे येथे वारंवार भूकंप, फॉल्टलाइन क्रिया आणि ज्वालामुखी उद्रेक आढळतात.
ज्वालामुखीय राख संरचना कशी असते ?
• राखेमध्ये प्रामुख्याने सिलिका (Silica), ग्लासचे सूक्ष्म कण,फेल्डस्पार (Feldspar), क्वार्ट्ज (Quartz), सल्फर डायऑक्साइड (Sulphur dioxide) आणि इतर वायू असतात.
• ही राख अत्यंत सूक्ष्म व हलकी असल्याने ती दूरवर पसरते.
• अशा राखेमुळे विमानांच्या इंजिनमध्ये नुकसान होऊ शकते, म्हणून ती विमानवाहतुकीसाठी धोकादायक मानली जाते.
क्षती आणि प्रभाव :
• इथिओपियातील जवळच्या भागांत राखेमुळे लोकांना श्वसन व आरोग्य समस्या निर्माण झाल्या.
• अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द किंवा डायव्हर्ट करावी लागली.
• तांबडा समुद्र (Red Sea) परिसरातील विमानवाहतुकीवरही परिणाम झाला.
ज्वालामुखी उद्रेक का होतो ?
• पृथ्वीच्या केंद्राकडे जसे खाली जातो तससे तापमान वाढते — यालाच भूतापीय प्रवणता (Geothermal Gradient) म्हणतात.
• एका ठराविक खोलीवर तापमान इतके वाढते की खडक वितळतात आणि मॅग्मा तयार होतो.
• मॅग्मा आजूबाजूच्या घन खडकांपेक्षा हलका असल्याने वर सरकतो.
• वर येणारा मॅग्मा, मॅग्मा कक्षांमध्ये (Chambers) जमा होतो, जे साधारणत: पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 6 ते 10 किमी खोलीवर असतात.
• दबाव वाढत गेल्यावर मॅग्मा पृथ्वीच्या पृष्ठभागातील फटी, छिद्रे व दरारांमधून बाहेर येतो, यालाच ज्वालामुखी उद्रेक म्हणतात.

मॅग्मा आणि लावा यातील फरक काय ?
• पृथ्वीच्या आतमध्ये मॅग्मा (Magma) तयार होतो तर
• पृष्ठभागावर पोहोचलेला मॅग्मा ला आपण लावा (Lava) म्हणतो.











