
चालू घडामोडी | संविधान दिवस | Constitution Day

संविधान दिवस
Constitution Day
Subject : GS - दिनविशेष, राज्यशास्त्र
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) राष्ट्रीय कायदा दिवस केव्हा असतो ?
1. 2 ॲाक्टोबर
2. 15 ॲागस्ट
3. 26 नोव्हेंबर
4. 26 जानेवारी
उत्तर : 26 नोव्हेंबर
बातमी काय ?
• भारतात दरवर्षी 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जातो.
• या दिवसाला राष्ट्रीय कायदा दिवस (National Law Day) असेही म्हणतात.
संविधान दिवस 26 नोव्हेंबरला च का साजरा करतात ?
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला त्याच्या स्मरणार्थ 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून कोणत्या वर्षी घोषित केला ?
• नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्य वाढवण्यासाठी, 2015 मध्ये सरकारने हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला.
• 2015 मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने, दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस भारत सरकारने ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
तर मग 26 जानेवारी का साजरी करतात ?
• 26 जानेवारी 1950 पासून घटना लागू झाली त्यामुळे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन (गणराज्य दिन) म्हणून साजरा केला जातो.
भारतीय राज्यघटने बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर :
• भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे.
• मूळ घटना 251 पृष्ठांची आहे.
• 1949 त्या मूळ घटनेत प्रास्ताविका, 22 भाग, 395 कलमे व 8 अनुसूचीं चा समावेश होता.
संविधान सभेबद्दल परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती :
• 1946 च्या कॅबिनेट मिशनच्या अंतर्गत संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
• 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक भरली.
• डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
• पुढे 11 डिसेंबर 1946 रोजी :
- संविधान सभेचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
- संविधान सभेचे उपाध्यक्ष - एच. सी. मुखर्जी
- संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार - सर बी. एन. राव
यांची नेमणूक करण्यात आली.
• 26 नोव्हेंबर 1949 रोजी 284 सदस्यांनी स्वाक्षरी करून घटनेचा स्वीकार करण्यात आला.















