
चालू घडामोडी | महापारेषणला PRSI कडून 3 राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

PRSI Announces 3 National Awards to M.S.E.T.C.L.
Subject : GS - पुरस्कार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाकडू महापारेषणला मिळालेल्या विशेष पुरस्काराचे नाव काय ?
1. सर्वोत्तम तांत्रिक सुधारणा
2. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान
3. ऊर्जा नवकल्पना पुरस्कार
4. CSR उत्कृष्टता पुरस्कार
उत्तर : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान
बातमी काय ?
• महापारेषणच्या जनसंपर्क विभागाला पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील तीन पारितोषिके जाहीर झाली.

महापारेषणला कोणते पुरस्कार मिळाले ?
1. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी राष्ट्रीय जागृती अभियान - हा विशेष पुरस्कार
2. सर्वोत्कृष्ट सोशल मीडिया अँड पीआर
3. सर्वोत्कृष्ट ॲडफिल्म (इंग्रजी) पुरस्कार
पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाकडून महापारेषणला पुरस्कार का मिळाले ?
• डिजिटल जनसंपर्कातील नवकल्पना जसे की QR कोड, ई-न्यूजलेटर, WhatsApp बुलेटिन इत्यादी.
• ड्रोनद्वारे दुर्गम भागात वीजपुरवठा दाखवणारी ॲडफिल्म राष्ट्रीय स्तरावर निवडली गेली.
• महापारेषणचे व्हॉटसअप बुलेटिन, ऑडिओ-व्हिज्युअल्स बुलेटिन, व्हॉटसअप चॅनेल, समाजमाध्यमांचा सकारात्मक पद्धतीने जनसंपर्कासाठी वापर करत केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवल्या.
ॲडफिल्म (इंग्रजी) खास का ठरली ?
• उच्चदाब वीजवाहिनीची सुरक्षा, वीजपुरवठ्यातील आव्हाने आणि ड्रोनद्वारे केलेली कामगिरी अॅनिमेशनसह दाखवली.
• या फिल्मची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
महापारेषणचे पुरस्कार :
• महापारेषणला जनसंपर्क क्षेत्रातील 14 राष्ट्रीय आणि 1 आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
• महापारेषण ही महाराष्ट्रातील सर्वाधिक पुरस्कारप्राप्त शासकीय कंपनी आहे.
महापारेषण म्हणजे काय ?
• महापारेषणचे पूर्ण नाव महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित' (Maharashtra State Electricity Transmission Company Limited) असे आहे.
• संक्षिप्त नांव : Mahatransco किंवा M.S.E.T.C.L.
• मालकी : महापारेषण ही संपूर्णपणे महाराष्ट्र शासनाच्या मालकीची, सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे.
• स्थापना : पूर्वीच्या ‘महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ’ या संस्थेची पुनर्रचना करण्यात आल्यानंतर जून 2005 मध्ये ‘महापारेषण’ कंपनी अस्तित्वात आली.
महापारेषण कंपनी काय काम करते ?
• उद्देश : राज्यभर सुरळीत आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करणे.
• विजेच्या निर्मिती स्थानापासून ते वितरण केंद्रापर्यंत वीज पोहोचविण्याची म्हणजेच विजेचे पारेषण करण्याची जबाबदारी महापारेषण कंपनीवर आहे.
• विजेचे पारेषण हे सुरक्षितपणे, तसेच विजेची कमीत-कमी हानी होईल आणि तिचा भार समतोल राहील, अशा पध्दतीने करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे कार्य ‘महापारेषण’ कंपनी करीत आहे.



















