
चालू घडामोडी | ITBP Plans to establish 10 All-Women Border Outposts | भारत–चीन LAC वर ITBP ची 10 ऑल-वुमन बॉर्डर पोस्ट

ITBP plans to establish 10 All-Women Border Outposts
भारत–चीन LAC वर ITBP ची 10 ऑल-वुमन बॉर्डर पोस्ट
Subject : GS - संरक्षण, सरकारी योजना- उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ITBP च्या ऑल-वुमन बॉर्डर आउटपोस्टची सुरुवात सर्वप्रथम कुठून होणार आहे ?
1. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम
2. आसाम आणि शिमला
3. लडाख आणि हिमाचल प्रदेश
4. राजस्थान आणि पंजाब
उत्तर : लडाख आणि हिमाचल प्रदेश
बातमी काय ?
• ITBP, भारत–चीन वास्तविक नियंत्रण रेषे वर 10 ऑल-वुमन बॉर्डर आउटपोस्ट (BOPs) स्थापन करत आहे.

ITBP ऑल-वुमन पोस्ट बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• भारत-चीन सीमेवर इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) लवकरच 10 पूर्णपणे महिलांच्या सीमा चौक्या (All-Women Border Posts - BOPs) उभारणार आहे, ज्यामुळे वास्तविक नियंत्रण रेषा (Line of Actual Control -LAC) वरील सुरक्षा अधिक मजबूत होईल.
• पहिल्या पोस्ट लडाखच्या लुकुंग आणि हिमाचलच्या थांगी येथे सुरू होणार आहेत.
• उद्देश : भारत-चीन सीमेवरील सुरक्षा वाढवणे आणि महिलांना सीमा संरक्षणात अधिक संधी देणे.
• ठिकाणे : सुरुवातीला लडाख (लुकुंग) आणि हिमाचल प्रदेश (थांगी) येथे या चौक्या सुरू होतील.
• उंची : या चौक्या समुद्रसपाटीपासून 9,000 ते 14,000 फूट उंचीवर असतील.
• योजना : 'फॉरवर्डायझेशन' धोरणांतर्गत, ITBP ने आपल्या चौक्यांची संख्या वाढवली आहे आणि भविष्यात अशा आणखी 41 चौक्या उभारण्याची योजना आहे.
या उपक्रमाचे महत्त्व काय ?
• महिला सशक्तिकरण : कठीण सीमाक्षेत्रात महिलांची सक्रिय भूमिका, भारतात प्रथमच इतक्या उंचीवर पूर्ण महिला पोस्ट असतील.
• सीमा सुरक्षा मजबूत : चीन सीमेजवळ अधिक नजर आणि सततची उपस्थिती.
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाची (ITBP) स्थापना केव्हा करण्यात आली ?
‣ भारत-चीन युद्धानंतर 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत-तिबेटी सीमेवरील सीमा गुप्तचर आणि सुरक्षा मजबूत करण्यासाठी इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाची स्थापना करण्यात आली.
‣ बर्फाळ हिमालयीन सीमेवरील सेवेमुळे ITBP ला 'हिमवीर' म्हणूनही ओळखले जाते.
• मंत्रालय : ITBP गृह मंत्रालया (Ministry of Home Affairs) अंतर्गत काम करते.
• बोधवाक्य (Motto) : "शौर्य- दृढता-कर्म-निष्ठा" (Shaurya – Dridhata – Karma Nishtha)



















