
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस

International Day of Persons with Disabilities 2025
Subject : GS - दिनविशेष, सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिव्यांग व्यक्तींच्या सन्मानार्थ दरवर्षी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस केव्हा आयोजित करण्यात येतो ?
1. 24 ऑक्टोबर
2. 12 नोव्हेंबर
3. 1 डिसेंबर
4. 3 डिसेंबर
उत्तर : 3 डिसेंबर
• 24 ऑक्टोबर : जागतिक पोलिओ दिवस
• 12 नोव्हेंबर : जागतिक न्यूमोनिया दिन
• 1 डिसेंबर : जागतिक एड्स दिन
• 3 डिसेंबर : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसा संदर्भात परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस दरवर्षी 3 डिसेंबर रोजी पाळला जातो.
• आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाला जागतिक दिव्यांग व्यक्ती दिन असेही म्हणतात.
दिव्यांग व्यक्तींची (वेगवेगळ्या सक्षम/अपंग व्यक्ती) व्याख्या काय आहे ?
• अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 नुसार अशी व्यक्ती जी, दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक अथवा संवेदनाक्षम दौर्बल्य असून, जी समाजात सहभागी होताना इतरांसोबत विविध अडथळ्यांमुळे संवाद साधू शकत नाही.
• केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगत्वाचे 21 प्रवर्ग निश्चित केले आहेत.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 1992 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या 47/3 ठरावाद्वारे 'आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस' घोषित करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे उद्दिष्ट काय आहे ?
• दिव्यांग व्यक्तींवरील सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
• दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांची आणि गरजांची पूर्तता करण्यासाठी समाजात जागरुकता निर्माण करणे
• जगभरात दिव्यांगांची चिकाटी, नेतृत्व आणि त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे उद्दिष्ट आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
What is the theme of the International Day of Persons with Disabilities 2025 ?
• "सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांगांचा सहभाग असलेल्या समाजाला चालना देणे" ही यंदाच्या आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाची संकल्पना आहे.
• “Fostering Disability-Inclusive Societies for Advancing Social Progress.”
अपंग व्यक्तींच्या हक्कांवरील अधिवेशन (Convention on the Rights of Persons with Disabilities) :
• संयुक्त राष्ट्रांनी 2006 मध्ये अपंग व्यक्तींच्या हक्कांवरील अधिवेशन स्वीकारले होते.
• भारताने या अधिवेशनावर 2007 मध्ये सही केली.
• हे अधिवेशन स्वीकारल्यामुळे शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा आणि इतर आंतरराष्ट्रीय विकास फ्रेमवर्कच्या अंमलबजावणीमध्ये अपंग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण अधिक महत्त्वाचे केले आहे.

भारतात आणि महाराष्ट्रात दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या किती आहे ?
• 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 2.68 कोटी दिव्यांग आहेत, जे एकूण लोकसंख्येच्या 2.21% आहेत.
• सन 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रामध्ये 29,63,392 दिव्यांग व्यक्ती असून त्यांची संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 2.63% आहे.
• महाराष्ट्रात दि.15.12.2022 च्या अधिसूचनेन्वये दिव्यांग कल्याण हा नवीन मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे.
दिव्यांगांसाठी सरकारी योजना/कार्यक्रम कोणते ?
• दिव्यांग व्यक्तींसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि न्याय व्यवस्थेतील सुविधा सुधारण्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.
• दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष धोरणे आणि कायदे तयार केले आहेत.
उदाहरणार्थ :
• दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना
• जिल्हा अपंगत्व पुनर्वसन केंद्र
• अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 च्या अंमलबजावणीसाठी योजना
• दिव्यांग व्यक्तींना साधने आणि उपकरणांच्या खरेदी आणि (जागेवर) बसवण्यासाठी आर्थिक सहाय्य योजना
• दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती















