
चालू घडामोडी | जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025

WorldSkills Asia Competition 2025
Subject : GS - खेळ
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताने कितवा क्रमांक मिळविला ?
1. पहिला
2. चौथा
3. पाचवा
4. आठवा
उत्तर : आठवा
बातमी काय ?
• भारताने 2025 मध्ये पहिल्यांदाच जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा (WorldSkills Asia Competition) मध्ये भाग घेतला.

जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 कोणत्या ठिकाणी आणि केव्हा झाली ?
• स्थळ : ताइपे, ताइवान (Taipei, Taiwan)
• तारीख : 27-29 नोव्हेंबर 2025
• आयोजक : ही स्पर्धा WorldSkills Asia कडून आयोजित करण्यात आली.
• WorldSkills Asia ही WorldSkills International ची आशिया स्तरावरील स्पर्धा विभाग आहे.
जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेबद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हा सहभाग कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (Ministry of Skill Development and Entrepreneurship) यांच्या नेतृत्वाखाली झाला.
• National Skill Development Corporation (NSDC) व तांत्रिक भागीदारांनी प्रशिक्षण, तयारी आणि तांत्रिक समर्थन दिले.
• भारतीय टीममध्ये 23 स्पर्धक होते, ज्यांनी 21 कौशल्य स्पर्धांमध्ये भाग घेतला.
• भारतीय स्पर्धकांनी पारंपरिक तसेच तंत्रज्ञान आधारित क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
2025 च्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धेत पहिला क्रमांक कोणी मिळविला ?
1) पहिला क्रमांक : United Arab Emirates (UAE) 🇦🇪
UAE ने 10 पदके जिंकली (4 सुवर्ण, 4 रौप्य, 2 मेडालियन फॉर एक्सीलेंस) आणि पहिला क्रमांक मिळविला.
2) दुसरा क्रमांक : सऊदी अरेबिया 🇸🇦
3) तिसरा क्रमांक : मलेशिया 🇲🇾
जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताची कामगिरी ?
• भारताने 1 रौप्य पदक, 2 कांस्य पदके आणि 3 उत्कृष्टता पदकं (Medallions for Excellence) जिंकली.
• 29 देशांमधून 8वा क्रमांक मिळवत भारताने कौशल्य क्षेत्रात आपली जागतिक ओळख मजबूत केली.
• ज्यातून जागतिक कौशल्य क्षेत्रात भारताचा वेगाने वाढता प्रभाव दिसून आला.

महिला स्पर्धकांचा विशेष ठसा :
• महिला स्पर्धकांनी काही अपारंपारिक कौशल्यांमध्येही उत्तम कामगिरी केली.
• काहींना त्यांच्या कौशल्यात “Best in the Country” हा सन्मान मिळाला.
• हे भारतातील महिला कौशल्य विकासाची वाढ दर्शवणारे महत्त्वाचे पाऊल आहे.













