
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय चित्ता दिन

International Cheetah Day
Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आंतरराष्ट्रीय चित्ता दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
1. 1 डिसेंबर
2. 4 डिसेंबर
3. 22 मे
4. 5 जानेवारी
उत्तर : 4 डिसेंबर
बातमी काय ?
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय चित्ता दिनानिमित्त चित्त्याच्या संवर्धनासाठी कार्यरत सर्व संवर्धन कार्यकर्ते आणि वन्यजीवप्रेमींना शुभेच्छा दिल्या
आंतरराष्ट्रीय चित्ता दिन केव्हा साजरी करण्यात येतो ? आणि का ?
• आंतरराष्ट्रीय चित्ता दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
• हा दिवस अमेरिकन प्राणीशास्त्रज्ञ डॉ. लॉरी मार्कर (Dr. Laurie Marker) यांनी सुरू केला.
• त्यांनी वाढवलेल्या ‘खयाम’ (Khayam) नावाच्या चित्त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
• मुख्य उद्देश : जगभरात चित्ता नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर असल्याने, त्याच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

प्रोजेक्ट चित्ता म्हणजे काय ?
• लॅान्च : प्रोजेक्ट चित्ता हा भारत सरकारचा 2022 मध्ये सुरू केलेला महत्वाकांक्षी प्रकल्प आहे.
• उद्दिष्ट : सुमारे 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात आणणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
• जगातील पहिला : हा प्रकल्प प्रोजेक्ट टायगर अंतर्गत राबवला जात असून, तो जगातील पहिला आंतरखंडीय मोठ्या मांसाहारी प्राण्यांचा स्थलांतर प्रकल्प मानला जातो.
प्रोजेक्ट चित्त्याची प्रमुख उद्दिष्टे कोणती ?
• भारतातील योग्य अधिवासांमध्ये प्रजननक्षम चित्ता लोकसंख्या निर्माण करणे.
• चित्त्यांना प्रमुख प्रजाती (Flagship Species) म्हणून वापरून,
• खुली जंगले आणि गवताळ प्रदेश पुनरुज्जीवित करणे.
• स्थानिक समुदायामध्ये पर्यावरण विकास आणि पर्यावरण पर्यटनाला (Eco-Development and Ecotourism) प्रोत्साहन देणे.
• पर्यावरण आणि चित्ता संवर्धनाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे.

चित्ता प्रकल्पाची अंमलबजावणी कोण करत आहे ?
• प्रोजेक्ट चित्ता हा प्रकल्प National Tiger Conservation Authority (NTCA) यांच्या नेतृत्वाखाली राबवला जात आहे.
• यामध्ये मध्य प्रदेश वन विभाग, Wildlife Institute of India (WII) यांचे सहकार्य आहे.
• प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी 2023 मध्ये Cheetah Project Steering Committee स्थापन करण्यात आली आहे.
प्रोजेक्ट चित्त्याची आतापर्यंतची कामगिरी :
या प्रकल्पाअंतर्गत,
• नामिबियामधून 🇳🇦 8️⃣ चित्ते 🐆
• दक्षिण आफ्रिकेतून 🇿🇦 1️⃣2️⃣ चित्ते 🐆 भारतामध्ये आणण्यात आले.
• हे सर्व चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno National Park) सोडण्यात आले.
• डिसेंबर 2025 पर्यंत, भारतामध्ये एकूण 32 चित्ते असून त्यापैकी 21 चित्त्यांचा जन्म भारतातच झाला आहे, हे या प्रकल्पाचे मोठे यश मानले जाते.

















