
चालू घडामोडी | काशी तमिळ संगमम् 4.0

Kashi Tamil Sangamam 4.0
Subject : GS - सरकारी योजना- उपक्रम, सण आणि उत्सव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) काशी–तमिळ संगमम् 4.0 चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?
1. चेन्नई
2. मदुराई
3. वाराणसी
4. प्रयागराज
उत्तर : वाराणसी
बातमी काय ?
• केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वाराणसी येथे काशी–तमिळ संगमम् 4.0 चे संयुक्तपणे उद्घाटन केले, ज्यातून काशी आणि तामिळनाडू यांतील प्राचीन सांस्कृतिक नाते पुन्हा अधोरेखित झाले.
काशी–तमिळ संगमम् म्हणजे काय ?
काशी–तमिळ संगमम् केव्हा पासून सुरू करण्यात आला ?
• काशी तमिळ संगमम हा शतकानुशतके भारतीयांच्या कल्पनेत जिवंत असलेल्या संबंधाचा एक उत्सव आहे.
• काशी–तामिळ संगमम् ही संकल्पना 2022 मध्ये ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत सुरू करण्यात आली.
• उद्देश : या उपक्रमाचा उद्देश काशी आणि तामिळनाडू यांच्यातील ज्ञान, आध्यात्म, भाषा आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेचा उत्सव साजरा करणे हा आहे.
काशी–तमिळ संगमम् 4.0 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• या आवृत्तीची संकल्पना आहे "तमिळ कर्कलाम (Tamil Karkalam) – चला तामिळ शिकूया" हि आहे.
• तामिळ भाषा शिकणे आणि भाषिक एकात्मता वाढवणे हा या संगमाचा केंद्रबिंदू आहे.
काशी–तमिळ संगमम् 4.0 प्रमुख उपक्रम कोणते ?
तमिळ कर्कळम (Tamil Karkalam) :
• तमिळ कर्कळम म्हणजे “चला तमिळ शिकूया” - उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्यांना तमिळ शिकवणे.
• वाराणसीतील शाळांमध्ये तामिळ भाषा शिकवणे.
• यासाठी 50 तामिळ शिक्षक, वाराणसीतील 50 शाळांमध्ये 1,500 विद्यार्थ्यांना तामिळ भाषा शिकवणार आहेत.
तमिळ कर्पोम (Tamil Karpom) :
• तमिळनाडूला भेट देताना तमिळ शिका – अभ्यास दौरा कार्यक्रम
• उत्तर प्रदेशातील 300 कॉलेज विद्यार्थी तमिळ भाषा शिकण्यासाठी 10 तुकड्यांमध्ये तमिळनाडूला भेट देतील.
• हे विद्यार्थी तामिळनाडूला जाऊन भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक स्थळांचा अनुभव घेतील.
संत अगस्त्य वाहन मोहीम (Sage Agastya Vehicle Expedition) :
• तेनकाशी ते काशी सांस्कृतिक प्रवास
• ही मोहीम तामिळनाडूतील तेनकाशी म्हणजेच (दक्षिण काशी) येथून 2 डिसेंबर 2025 रोजी सुरु होईल व 10 डिसेंबर 2025 रोजी काशी येथे पोचेल.
• या सांस्कृतिक प्रवासात चेरा, चोल, पांड्य, पल्लव, चालुक्य, विजयनगर यांसारख्या राजवंशांमधील संबंध अधोरेखित केले जातील.
• तसेच तमिळ आणि भारतीय ज्ञानपरंपरेचा सामायिक वारसा साजरा केला जाईल.
काशी–तामिळ संगमम् 4.0 चा समारोप कोठे होणार आहे ?
• काशी–तामिळ संगमम् 4.0 चा समारोप रामेश्वरम येथे होणार असून,
• यामुळे काशी ते तामिळनाडू असा उत्तर–दक्षिण सांस्कृतिक प्रवास पूर्ण होईल.


















