
चालू घडामोडी | जागतिक मृदा दिवस 2025

World Soil Day 2025
Subject : GS - दिनविशेष, भूगोल- कृषी, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक मृदा दिना विषयी खालील विधानांचा विचार करा आणि योग्य विधान/ विधाने असलेला पर्याय निवडा
अ) दरवर्षी 2 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.
ब) पहिला जागतिक मृदा दिन 2012 मध्ये साजरी करण्यात आला.
क) थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्मदिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात.
पर्याय :
1. अ आणि ब बरोबर
2. अ आणि क बरोबर
3. ब आणि क बरोबर
4. फक्त क बरोबर
उत्तर : फक्त क बरोबर
बातमी काय ?
• दरवर्षी 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन साजरा केला जातो.
जागतिक मृदा दिना बद्दल परिक्षेच्या दृष्टीने IMP वनलाईनर पॉईंट्स :
जागतिक मृदा दिन 5 डिसेंबर लाच का साजरी करतात ?
जागतिक मृदा दिन कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• थायलंडचे दिवंगत राजा भूमिबोल अदुल्यादेज हे मृदा संवर्धन उपक्रमात प्रमुख समर्थक होते.
• 5 डिसेंबर हा थायलंडचे राजा भूमिबोल अदुल्यादेज यांचा जन्मदिवस, मृदा संवर्धनात त्यांनी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ 5 डिसेंबर हा त्यांचा जन्मदिवस जगभरात जागतिक मृदा दिन म्हणून साजरा करतात.

पहिला जागतिक मृदा दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• मातीचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 2013 मध्ये अधिकृतपणे जागतिक मृदा दिनाला मान्यता दिली.
• 5 डिसेंबर 2014 रोजी पहिला जागतिक मृदा दिन साजरी करण्यात आला.
जागतिक मृदा दिन 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• "निरोगी शहरांसाठी निरोगी माती" (Healthy Soils for Healthy Cities) ही जागतिक मृदा दिन 2025 ची थीम आहे.
• डांबर, इमारती आणि रस्त्यांखाली माती आहे.
• ही माती जर पाणी झिरपण्या योग्य आणि वनस्पतींनी भरलेली असेल तर पावसाचे पाणी शोषण्यास, तापमान नियंत्रित करण्यास, कार्बन साठवण्यास आणि हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
• परंतु जेव्हा ते सिमेंटने बंद केले जाते तेव्हा ते ही कार्ये गमावते, ज्यामुळे शहरे पूर, अतिउष्णता आणि प्रदूषणास अधिक असुरक्षित बनतात.
• म्हणून, हा दिवस धोरणकर्त्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांना - हिरवीगार, अधिक लवचिक आणि निरोगी शहरे बांधण्यासाठी - शहरी जागांचा पुनर्विचार करण्यासाठी आमंत्रित करतो.
जागतिक मृदा दिन का साजरी करतात ?
• माती ही एक महत्त्वाची नैसर्गिक संसाधने आहे जी शेती, जैवविविधता आणि जल शुध्दीकरणाला आधार देते.
• माती जीवनासाठी महत्त्वाची आहे कारण ती वनस्पतींच्या वाढीस मदत करते. आणि, हे अनेक कीटक आणि प्राण्यांचे राहण्याचे ठिकाण आहे.
• अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चार अत्यावश्यक ‘जगण्याच्या’ घटकांचा माती हा स्रोत आहे.
• आपल्या पृथ्वीचे अस्तित्व मातीशी असलेल्या मौल्यवान दुव्यावर अवलंबून आहे.
• आपल्याला 95% अन्न मातीतून मिळते.
• याशिवाय, माती झाडांना आवश्यक असलेल्या 18 पैकी 15 नैसर्गिकरीत्या रासायनिक घटकांचा पुरवठा करते
• परंतु हवामान बदल आणि जंगलतोड, औद्योगिकीकरण यांसारख्या मानवी हस्तक्षेपामुळे मातीचा ऱ्हास होतो, नैसर्गिक समतोल बिघडतो तसेच अन्नातील जीवनसत्त्वे आणि पोषक घटकांची पातळी कमी होते.
• या सर्व गोष्टीं बद्दल लोकांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आणि जगभरातील लोकांना मातीचे महत्त्व आणि संवर्धन करण्यासाठी यासंदर्भात लोकांना जागरूक करण्यासाठी जागतिक मृदा दिन साजरा करतात.



















