
चालू घडामोडी | वेरूळ परिसरातील दुर्लक्षित पण महत्त्वाची वारसा स्थळे

Neglected yet significant heritage sites around the Ellora Cave
Subject : GS - इतिहास - कला आणि संस्कृती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) स्कॉटिश इतिहासकारांनी महाराष्ट्र सरकारला वेरूळ परिसरातील दुर्लक्षित पण महत्त्वाच्या कोणत्या वारसा स्थळांना जागतिक पर्यटन व वारसा नकाशावर आणण्याची मागणी केली आहे ?
1. मलिक अंबरची कबर
2. पहिल्या पेशव्यांची समाधी
3. शेवटच्या ऑट्टोमन खलिफाचा रिकामा मकबरा
4. वरीलपैकी सर्व
उत्तर : वरीलपैकी सर्व
बातमी काय ?
• एका स्कॉटिश इतिहासकाराने महाराष्ट्र सरकारला वेरूळ परिसरातील दुर्लक्षित पण महत्त्वाच्या वारसा स्थळांना जागतिक पर्यटन व वारसा नकाशावर आणण्याची मागणी केली आहे.
स्कॉटिश इतिहासकाराने लक्ष वेधलेली दुर्लक्षित पण महत्त्वाचे वारसा स्थळे कोणते ?
मलिक अंबरची कबर (खुलताबाद) (Malik Ambar’s Tomb) :
• अहमदनगरच्या निजामशाहीतील विख्यात राजकीय रणनीतिकार.
• मराठा–दख्खन इतिहासातील अत्यंत महत्त्वाची व्यक्ती.
पहिल्या पेशव्यांची समाधी (First Peshwa’s Tomb) :
• मराठा साम्राज्याच्या सुरुवातीच्या पेशवाई इतिहासाशी संबंधित.
शेवटच्या ऑट्टोमन खलिफाचा रिकामा मकबरा (Empty Tomb of the last Ottoman Caliph) :
• खुलताबाद परिसरातील इस्लामी वारशाचे अत्यंत महत्वाचे प्रतीक.
• आंतरराष्ट्रीय इतिहासाशी महाराष्ट्राचे अनोखे नाते दर्शवणारा ठसा.

वेरूळ लेणी (Ellora Caves) बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• UNESCO जागतिक वारसा स्थळ : 1983
• एकूण 34 भव्य, दगडात कोरलेले बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी असलेला जगातील सर्वात मोठा रॉक-कट कॉम्प्लेक्स.
• स्थान : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र.
• कालखंड : 600 CE ते 1000 CE दरम्यान बांधकाम.
वेरूळची प्रमुख लेणी — कालानुसार विभागणी :
बौद्ध लेणी (1–12) ~200 BCE – 600 CE :
• साध्या गुहांपासून → विहार, ध्यानकक्ष, चैत्यगृह अशा सुबक व संरचित धार्मिक केंद्रांपर्यंतची उत्क्रांती.
• बौद्ध भिक्षूंच्या ध्यान–शिक्षण परंपरेचे उत्कृष्ट दर्शन.
• या लेणींमध्ये शांतता, साधेपणा आणि आध्यात्मिक शिस्त दिसते.
हिंदू लेणी (13–29) ~500 CE – 900 CE :
• राष्ट्रकूट राजवटीच्या शिल्पकलेचा सर्वोत्तम नमुना.
• भव्य खांब, पुराणकथांवरील कोरीवकाम, देवतांच्या सजीव वाटणाऱ्या मूर्ती.
• या समूहातील कैलासा मंदिर हे भारतीय शिल्पकलेतील असामान्य कर्तृत्व—पूर्णपणे एका दगडातून साकारलेले.
जैन लेणी (30–34) ~800 CE – 1000 CE :
• अत्यंत बारकाईने केलेले कोरीवकाम, नाजूक अलंकार, सुबक खांब.
• जैन तत्त्वज्ञानातील संयम, तपश्चर्या आणि आत्मशुद्धीचे दर्शन.
• आकाराने लहान पण कलात्मकदृष्ट्या अतिशय समृद्ध.
कैलास मंदिर (Cave 16) — एलोराचा मुकुटमणी
• जगातील सर्वात मोठी एकाश्म (Monolithic) शिल्परचना — पूर्ण मंदिर एकाच दगडातून कोरलेले.
• बांधकाम पद्धत अद्वितीय: वरून खाली कोरून सुमारे 1.5 ते 2 लाख टन दगड काढून टाकला.
• भगवान शिवाला समर्पित रथाकृती मंदिर.
• भव्य वैशिष्ट्ये :
- नंदी मंडप
- रावणाने कैलास पर्वत हलवण्याचे दृश्य
- जीवन आकाराची हत्तीमूर्ती
- नृसिंहाची प्रभावी शिल्परचना



















