
चालू घडामोडी | 26वा हॉर्नबिल महोत्सव

26th Hornbill Festival
Subject : GS - कला आणि संस्कृती - राज्य आणि उत्सव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) हॉर्नबिल फेस्टिव्हल 2025 साठी नागालँडने खालील पैकी कोणते देश अधिकृतपणे भागीदार देश म्हणून घोषित केले ?
1. म्यानमार आणि नेपाळ
2. भूतान आणि नेपाळ
3. युनायटेड किंग्डम आणि आयर्लंडल
4. कंबोडिया आणि व्हिएतनाम
उत्तर : युनायटेड किंग्डम आणि आयर्लंडल
बातमी काय आहे ?
• नागालँड मधील किसामा हेरिटेज गावात 26व्या हॉर्नबिल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
हॉर्नबिल फेस्टिव्हल 2025 बद्दल परिक्षेच्या दृष्टीने IMP वनलाईनर पॉईंट्स :
🌍 • Country Partners : या वर्षी युनायटेड किंग्डम 🇬🇧 , आयर्लंड 🇮🇪, फ्रान्स 🇫🇷, ऑस्ट्रिया 🇦🇹, माल्टा 🇲🇹 आणि स्वित्झर्लंड🇨🇭 हे देश भागीदार म्हणून सामील झाले आहेत.
🗺️ • State Partner : तर अरुणाचल प्रदेश 🌄 भागीदार राज्य म्हणून सामील झाला आहे.
हॉर्नबिल फेस्टिव्हल केव्हा आणि कोठे आयोजित करण्यात येतो ?
• नागालँड सरकार द्वारे आयोजित दहा दिवसांचा वार्षिक पर्यटन प्रचार कार्यक्रम आहे.
• 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागालँड मध्ये हॉर्नबिल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
• नागालँडची राजधानी कोहिमाच्या दक्षिणेस 12 किमी अंतरावर असलेल्या किसामा हेरिटेज गावात (Kisama Heritage Village)🏞️ हा सण साजरा केला जातो.
या सणाला हॉर्नबिल फेस्टिव्हल असे का म्हणतात ?
• या सणाला “इंडियन हॉर्नबिल” या पक्ष्याचे नाव देण्यात आले आहे, जो राज्यातील बहुतेक जमातींच्या लोककथांमध्ये प्रदर्शित केला जातो.
• इंडियन हॉर्नबिल या पक्षाला धनेश असे म्हटले जाते.
• पूर्वीपासून नागा लोक धनेश या पक्षाला जंगलाचा राखणदार मानत आले आहेत.
• त्याची शिंगाच्या आकाराची चोच आणि काळी-पांढरी लांबलचक पिसे यांना नागा संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे.

📜 हॉर्नबिल फेस्टिव्हलची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली ?
• 2000 मध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली.
🎯 हॉर्नबिल फेस्टिव्हलचा उद्देश काय आहे ?
हॉर्नबिल फेस्टिव्हल का साजरी करतात ?
• या उत्सवाचा उद्देश आंतर-आदिवासी परस्परसंवादाला चालना देणे आणि नागालँडचा वारसा जतन करणे, समकालीन आणि पारंपारिक एकता आणि एकात्मता निर्माण करणे.
🎭 हॉर्नबिल फेस्टिव्हलचे प्रमुख वैशिष्ट्य काय ?
• महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील 17 प्रमुख जमातीं एकाच व्यासपीठावर येऊन त्यांची लोकनृत्ये, विधी, पारंपारिक पोशाख, संगीत आणि संस्कृतीचे प्रदर्शन करतात.
• त्यामुळे हॉर्नबिल फेस्टिव्हलला नागालँडमध्ये "उत्सवांचा उत्सव" असेही म्हटले जाते.
















