
चालू घडामोडी | भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधन सेल प्रवासी नौका

India's first Indigenous Hydrogen Fuel Cell Ferry
Subject : GS - पर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी प्रवासी नौका कोणत्या ठिकाणी व्यावसायिक सेवेत सुरू करण्यात आली ?
1. मुंबई
2. कोची
3. प्रयागराज
4. वाराणसी
उत्तर : वाराणसी
बातमी काय ?
• भारताने वाराणसी येथे गंगेवर आपली पहिली पूर्णपणे स्वदेशी हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी प्रवासी नौका व्यावसायिक सेवेत दाखल केली.
• यामुळे भारताने स्वच्छ आणि पर्यावरणास अनुकूल अंतर्गत जलवाहतुकीत (Inland Water Transport) मोठी झेप घेतली आहे.

🚢 भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन इंधन सेलवर चालणारी प्रवासी नौका कोणी तयार केली ?
• ही नौका कोचिन शिपयार्ड लिमिटेड (Cochin Shipyard Limited) यांनी विकसित केली असून, भारताच्या स्वदेशी जहाजबांधणी क्षमतेचे हे उत्तम उदाहरण आहे.
• या नौकेची पहिली व्यावसायिक फेरी नमो घाट, वाराणसी येथून सुरू झाली.
या नौकेची प्रमुख वैशिष्ट्ये कोणते ?
• ही 24 मीटर लांबीची, वातानुकूलित (AC) प्रवासी कॅटामरॅन नौका आहे.
• या नौकेत एकावेळी सुमारे 50 प्रवासी आरामात प्रवास करू शकतात.
• लो-टेम्परेचर PEM (Proton Exchange Membrane) फ्युएल सेल तंत्रज्ञानामुळे नौकेचा प्रवास शांत व कंपनरहित होतो.
• नौका चालताना फक्त पाणी बाहेर पडते, त्यामुळे गंगा नदीत कोणतेही प्रदूषण होत नाही.
• एकदा हायड्रोजन भरल्यानंतर ही नौका सुमारे 8 तास सतत चालू शकते.
• हायड्रोजन फ्युएल सेल, बॅटरी आणि सोलर पॅनल्स यांचा हायब्रिड वापर करून ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे.
• नौकेचा वेग सुमारे 6.5 नॉट्स असून तो सुरक्षित आणि ऊर्जा-बचत करणारा आहे.
• कॅटामरॅन रचनेमुळे नौका अधिक स्थिर राहते आणि प्रवाशांना चांगली जागा मिळते.
हायड्रोजन इंधन सेल म्हणजे काय ?
What is a Hydrogen Fuel Cell ?
• हायड्रोजन इंधन सेल ही अशी यंत्रणा आहे जी हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार करते.
• या प्रक्रियेतून वीज निर्मितीसोबत फक्त पाणी आणि उष्णता तयार होते.
• स्वच्छ पर्यायी इंधन पर्यायासाठी हायड्रोजन हे पृथ्वीवरील सर्वात मुबलक घटकांपैकी एक आहे.
हायड्रोजन इंधन सेल कसा कार्य करतो ?
How does a Hydrogen Fuel Cell Work ?
• हायड्रोजन वायू अॅनोडमध्ये प्रवेश करतो.
• उत्प्रेरकाच्या मदतीने हायड्रोजनचे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन वेगळे होतात.
• प्रोटॉन, मेंब्रेनमधून कॅथोडकडे जातात, तर इलेक्ट्रॉन बाह्य सर्किटमधून वाहून वीज निर्माण करतात.
• कॅथोडवर ऑक्सिजन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन एकत्र येऊन पाणी तयार होते.
हायड्रोजन इंधन सेलचे फायदे व उपयोग :
• हे तंत्रज्ञान शून्य प्रदूषण (Zero Emission) करते आणि पर्यावरणास अनुकूल आहे.
• पारंपरिक इंजिनांच्या तुलनेत याची ऊर्जा कार्यक्षमता जास्त असते.
• वाहन, बस, जहाजे, ड्रोन यांसारख्या वाहतुकीत तसेच इमारती व डेटा सेंटरसाठी वीजपुरवठ्यात याचा वापर होतो.
















