
चालू घडामोडी | युनेस्कोची २०वी आंतर-शासकीय समिती

20th UNESCO’S INTER-GOVERNMENTAL COMMITTEE
20th Session of the Intergovernmental Committe for Safeguarding of the Intangible Cultural Heritage
Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समितीच्या 20व्या अधिवेशनाचे यजमानपद कोणत्या देशाने भूषविले ?
1. फ्रान्स
2. जपान
3. इटली
4. भारत
उत्तर : भारत
बातमी काय ?
• भारत युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समितीचे 20 वे अधिवेशन आयोजित करीत आहे.
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समिती बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• आयोजक : भारत युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समितीचे (Intergovernmental Committee for the Safeguarding of Intangible Cultural Heritage – ICH) 20 वे अधिवेशन आयोजित करीत आहे.
• स्थान : हे अधिवेशन नवी दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) येथे होत आहे.
• या आयोजनामुळे भारतातील परंपरा, लोकसंस्कृती आणि जिवंत वारसा जपण्याबाबतची भूमिका जागतिक पातळीवर अधोरेखित झाली आहे.
युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीची आंतरशासकीय समिती म्हणजे काय ?
• ही युनेस्कोची (UNESCO) एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय समिती आहे.
• स्थापना : या समितीची स्थापना 2003 च्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षण कराराअंतर्गत (Convention for the Safeguarding of Intangible Cultural Heritage, 2003) करण्यात आली.
• उद्देश : जगभरातील लोकपरंपरा, कला, सण-उत्सव आणि कौशल्ये जतन करणे हे या समितीचे मुख्य काम आहे.
युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षणासाठीच्या आंतरशासकीय समितीची रचना :
• या समितीत 24 सदस्य देश असतात.
• हे देश अमूर्त सांस्कृतिक वारसा संरक्षण करारावर स्वाक्षरी केलेल्या राष्ट्रांच्या महासभेद्वारे (General Assembly of States Parties) निवडले जातात.
• सर्व प्रदेशांचे प्रतिनिधित्व व्हावे म्हणून युनेस्कोच्या सहा प्रादेशिक गटांनुसार सदस्य निवडले जातात.
• प्रत्येक देशाकडून अमूर्त सांस्कृतिक वारसा क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती समितीत सहभागी होतात.
समितीची मुख्य कामे :
• 2003 च्या करारातील उद्दिष्टे राबवणे.
• देशांना परंपरा जपण्याबाबत मार्गदर्शन करणे.
• प्रतिनिधिक यादी (Representative List) साठी आलेल्या नामांकनांची तपासणी करणे.
• धोक्यात असलेल्या परंपरांची यादी (Urgent Safeguarding List) तयार करणे.
• अमूर्त वारशाच्या संरक्षणासाठी नियम आणि आर्थिक तरतुदी ठरवणे.

अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे काय ?
• पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या लोकपरंपरा, लोककला, सण-उत्सव, विधी, हस्तकला आणि बोलीभाषा यांना अमूर्त सांस्कृतिक वारसा (Intangible Cultural Heritage – ICH) म्हणतात.
युनेस्कोच्या अमूर्त वारशाच्या याद्या किती आणि कोणत्या ?
• युनेस्कोने अमूर्त वारशासाठी 3 महत्त्वाच्या याद्या तयार केल्या आहेत:
1. प्रतिनिधिक यादी (Representative List)
2. तातडीच्या संरक्षणाची यादी (Urgent Safeguarding List)
3. उत्तम संरक्षण पद्धतींची नोंद (Register of Good Safeguarding Practices)

















