
चालू घडामोडी | भारतीय भाषा उत्सव 2025

Bharatiya Bhasha Utsav 2025
Subject : GS - कला आणि संस्कृती, साहित्य, दिनविशेष, व्यक्ती
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय भाषा उत्सव खालील पैकी कोणत्या महान कवींच्या सन्मानार्थ साजरी करण्यात येतो ?
1. तुलसीदास
2. कालिदास
3. सुब्रमण्य भारती
4. सूरदास
उत्तर : महाकवी सुब्रमण्य भारती
बातमी काय आहे ?
• शिक्षण मंत्रालयाने महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त, नवी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे भारतीय भाषा उत्सव 2025 चे आयोजन केले.
भारतीय भाषा उत्सव कोणाच्या सन्मानार्थ साजरी करतात ?
• भारतीय भाषा उत्सव महाकवी सुब्रमण्य भारती यांच्या सन्मानार्थ साजरी करतात.
भारतीय भाषा उत्सव का साजरी करतात ?
भारतीय भाषा उत्सव साजरी करण्याचा उद्देश काय आहे ?
• आपली सांस्कृतिक ओळख जपणे
• नागरिकांमध्ये एकता वाढवणे
• विद्यार्थ्यांमध्ये भारतीय भाषा आणि साहित्याबद्दल सखोल कृतज्ञता वाढवणे.
• बहुभाषिकतेला प्रोत्साहन देणे
• शिक्षण आणि संशोधनासाठी भारतीय भाषा माध्यम तयार करणे
• भाषाप्रेमींच्या नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणे
• आपल्या राष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत अंतर्भूत असलेल्या भाषिक विविधतेचा प्रचार आणि प्रसार करणे हे भारतीय भाषा उत्सव साजरी करण्याचा उद्देश आहे.
भारतीय भाषा उत्सव 2025 ची संकल्पना (थीम) काय आहे ?
• "अनेक भाषा, एक भावना" (Many Languages, One Emotion) ही 2025 या वर्षाची भारतीय भाषा उत्सवाची संकल्पना आहे.
आदरणीय महाकवी सुब्रमण्य भारती यांबद्दल थोडक्यात माहिती :
• सुब्रमणिया भारती हे भारतातील तमिळ लेखक, कवी, पत्रकार, भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, समाजसुधारक आणि बहुभाषिक होते.
• त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1882 रोजी तामिळनाडूमधील एट्ट्यापुरम् येथे झाला.
• सुब्रमण्य भारती यांना महाकवी भारतियार म्हणूनही ओळखले जाते.
• महाकवी सुब्रह्मण्य भारती यांना आधुनिक तमिळ शैलीचे जनक मानले जातात.

देशभक्त महाकवी सुब्रमण्य भारती :
• महाकवी सुब्रह्मण्य भारती यांनी आपल्या लेखनातून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत केली.
• त्यांनी आपल्या लिखाणातून भारतीय संस्कृतीचे मर्म आणि देशाचा आध्यात्मिक वारसा सर्वसामान्यांना समजण्यास सोपा असेल अशा भाषेतून लोकांपर्यंत पोहोचवला.
• महाकवी भारती यांची लोकमान्य टिळकांवर अपार निष्ठा होती.
• वाळ्ग तिलकन नामम वाळ्ग वाळ्गवे (टिळक नामाचा जय असो, त्रिवार जयजयकार असो) हे त्यांनी लिहिलेले गाणे अत्यंत प्रसिद्ध झाले.


















