
चालू घडामोडी | 'दिवाळी' ला युनेस्कोच्या जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान

Deepavali on UNESCO’s Intangible Cultural Heritage List
Subject : GS - कला आणि संस्कृती, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दिपावली सणाला युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत केव्हा समाविष्ट करण्यात आले ?
1. 18व्या अधिवेशनात
2. 19व्या अधिवेशनात
3. 20व्या अधिवेशनात
4. 21व्या अधिवेशनात
उत्तर : 20व्या अधिवेशनात
बातमी काय ?
• दीपावली या भारतातील प्रमुख सणाला UNESCO च्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा प्रतिनिधी यादीत नवी दिल्ली येथे झालेल्या 20व्या आंतरशासकीय समितीच्या अधिवेशनात अधिकृतपणे समाविष्ट करण्यात आले.
दिवाळीची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी :
• दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा, निराशेवर आशेचा आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय दर्शवणारा सण आहे.
• हा सण आनंद, नवचैतन्य, सामाजिक ऐक्य आणि मानवी मूल्ये यांचे प्रतीक मानला जातो.
• अनेक परंपरांनुसार प्रभू रामांचे अयोध्येत पुनरागमन झाल्यानंतर लोकांनी दिवे लावून आनंद व्यक्त केला, अशी श्रद्धा आहे.
• काही भागांमध्ये नरकासुरावर भगवान कृष्णाने मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दीपावली साजरी केली जाते.
• लक्ष्मीपूजनाच्या माध्यमातून समृद्धी, ऐश्वर्य आणि शुभतेची कामना केली जाते.
• अनेक प्रदेशांत दीपावलीचा संबंध पीक कापणीशी असून, शेतकरी या सणाद्वारे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
➡️ या विविध कथा, श्रद्धा आणि परंपरा एकत्र येऊन भारताची सांस्कृतिक विविधता आणि एकात्मता अधोरेखित करतात.
दिवाळी ‘जिवंत सांस्कृतिक वारसा’ का मानली जाते ?
Why is Diwali considered a 'Living Cultural Heritage'?
🪔 सामाजिक प्रथा :
• दिपावली साजरी करताना दिवे लावणे, रांगोळी काढणे, पूजन करणे आणि नातेवाईकांसोबत वेळ घालवणे या सामाजिक प्रथा आजही जिवंत आहेत.
👨👩👧👦 पिढ्यान्-पिढ्यांची परंपरा :
• हा सण पिढ्यान्-पिढ्या पुढे जात असून, परंपरा मुलांपर्यंत नैसर्गिकरित्या पोहोचतात.
🧑🎨 लोककेंद्रित सण :
• कुंभार, कारागीर, शेतकरी, मिठाईवाले, फुलविक्रेते आणि पूजासाहित्य विक्रेते यांच्याशी हा सण थेट जोडलेला आहे.
🌍 जागतिक साजरा :
• भारताबाहेर आशिया, आफ्रिका, युरोप, गल्फ आणि कॅरिबियन देशांमध्येही दीपावली साजरी केली जाते.
🤝 मूल्ये :
• समावेशकता, एकता, दानशीलता आणि समाजकल्याण ही मूल्ये दीपावलीतून व्यक्त होतात.
🌞 तत्त्व :
• “तमसो मा ज्योतिर्गमय” - अंधारातून प्रकाशाकडे जाणे ही संकल्पना या सणाचा आत्मा मानली जाते.
युनेस्कोचा “अमूर्त सांस्कृतिक वारसा” म्हणजे काय ?
What is UNESCO's "Intangible Cultural Heritage" (ICH) ?
• युनेस्कोचा अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणजे मानवजातीच्या जिवंत परंपरा आणि अभिव्यक्तींचा असा वारसा जो पूर्वजांकडून पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत आला आहे आणि आजही समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग आहे.
यात समाविष्ट घटक पुढीलप्रमाणे :
• मौखिक परंपरा व अभिव्यक्ती (उदा. लोककथा, गीते, म्हणी)
• सामाजिक प्रथा, विधी आणि उत्सव पद्धती
• निसर्ग व विश्वाशी संबंधित ज्ञान व कौशल्य
• पारंपरिक हस्तकला आणि कलाकौशल्य
• समूह किंवा समुदायाच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक असलेली प्रथा
भारतातील युनेस्को यादीत समावेश असलेले घटक :
1. वैदिक जप (2008)
2. रामलीला (2008)
3. कुट्टीयम संस्कृत थिएटर (2008)
4. राममन उत्सव (गढ़वाल) (2009)
5. मुदियेट्टू (केरळ) (2010)
6. कालबेलिया नृत्य (राजस्थान)(2010)
7. छाऊ नृत्य(2010)
8. बौद्ध जप (लडाख)(2012)
9. संकीर्तन (मणिपुर)(2013)
10. जादियाला गुरू (पंजाब) (2014)
11. योगा (2016)
12. कुंभमेळा (2017)
13. दुर्गा पूजा (कोलकाता) (2021)
14. गरबा नृत्य (गुजरात)(2023)
15. नौरोज (2024)
16. दिवाळी/ दिपावली (2025)



















