
चालू घडामोडी | योग महोत्सव–2026
Yoga Mahotsav–2026
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेल्या 'योग महोत्सव 2026' चे आयोजन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात करण्यात आले होते ?
1. नाशिक
2. पुणे
3. नागपूर
4. बुलढाणा
उत्तर : बुलढाणा
📰 बातमी काय ?
• आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेने महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार इथल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथे 'योग महोत्सव–2026' चे आयोजन केले.
🎯 योग महोत्सव-2026 कार्यक्रमाचा तपशील आणि विक्रम :
• ठिकाण - हा कार्यक्रम महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार (Lonar) येथे आयोजित करण्यात आला होता.
• विक्रम - जवळपास 5,000 सहभागींनी एकत्रितपणे 'त्रिकोणासन' (Trikonasana) केल्यामुळे या कार्यक्रमाची नोंद 'आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स' (Asia Book of Records) मध्ये झाली आहे.
• कालावधी - हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 च्या 75 दिवसांच्या उलटगणने चा (Countdown) भाग म्हणून आयोजित केला होता.

🤝 प्रमुख उपक्रम आणि मोहिमा :
या महोत्सवात आयुष मंत्रालयाच्या काही महत्त्वाच्या फ्लॅगशिप उपक्रमांचे सादरीकरण करण्यात आले:
• विमान प्रवासासाठी योग (Yoga for Air Travel) - प्रवासादरम्यानचा थकवा दूर करण्यासाठी योगाचा वापर.
• असंसर्गजन्य रोगांसाठी 10 योग प्रोटोकॉल - कर्करोग, मधुमेह यांसारख्या असंसर्गजन्य (Non-Communicable) रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष योगासने.
• योग 365 मोहीम - योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी राबवलेली मोहीम.

🤔 आंतरराष्ट्रीय योग दिन (IDY) 2026 चा दृष्टिकोन :
• आवृत्ती - 21 जून 2026 मध्ये होणारा हा 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन असेल.
• प्रमुख लक्ष - 2026 च्या योग दिनामध्ये असंक्रामक रोग (Non‑Communicable Diseases), वृद्ध व्यक्तींचे आरोग्य आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व योग यांचा समन्वय यावर विशेष भर दिला जाईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• ‘योग महोत्सव–2026’ आयोजन — लोणार, बुलढाणा
• आयोजन संस्था — मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था
• संबंधित मंत्रालय — आयुष मंत्रालय
• कार्यक्रम स्थळ — छत्रपती शिवाजी महाराज उद्यान
• विक्रम — सामूहिक त्रिकोणासन
• सहभाग — सुमारे 5,000 लोक
• नोंद — Asia Book of Records

















