
चालू घडामोडी | जागतिक हिमोफिलिया दिन

World Haemophilia Day
📚 Subject : GS - दिनविशेष, विज्ञान आणि तंत्रज्ञान - रोग आणि आजार
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) जागतिक हिमोफिलिया दिन केव्हा साजरा केला जातो ?
1. 14 एप्रिल
2. 17 एप्रिल
3. 22 एप्रिल
4. 30 एप्रिल
उत्तर : 17 एप्रिल
✍️ जागतिक हिमोफिलिया दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
• हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरूकता वाढवणे, उपचार आणि काळजीची उपलब्धता सुधारणे, तसेच हिमोफिलिया ग्रस्त व्यक्तींना आधार देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
• 1989 पासून वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया (WFH) या संस्थेमार्फत 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

🤔 जागतिक हिमोफिलिया दिन 17 एप्रिल याच दिवशी का साजरी करतात ?
• 1963 मध्ये फ्रँक श्नॅबेल यांनी वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया (World Federation of Haemophilia) या संस्थेची स्थापना केली.
• फ्रँक श्नॅबेल (Frank Schnabel) यांच्या सन्मानार्थ 17 एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस दिवस जागतिक हिमोफिलिया दिन म्हणून साजरा केला जातो.

🧐 हिमोफिलिया म्हणजे काय ?
🧐 What is Haemophilia ?
• हिमोफिलिया हा एक दुर्मिळ अनुवांशिक विकार आहे.
• ज्यामध्ये रक्त गोठण्याची क्षमता गंभीरपणे कमी होते,
• यात किरकोळ दुखापतींमधूनही दीर्घकाळ रक्तस्त्राव होतो.
🤔 जागतिक हिमोफिलिया दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• "निदान : काळजीची पहिली पायरी" (Diagnosis: First Step to Care) ही जागतिक हिमोफिलिया दिन 2026 ची थीम आहे.
• थीम निवडण्याचे कारण - 'वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया'च्या अहवालानुसार, जगभरातील हिमोफिलिया आणि इतर अनुवांशिक रक्तस्त्राव विकार असलेल्या एकूण रुग्णांपैकी जवळपास 75% लोकांचे अद्याप योग्य निदानच झालेले नाही.
• जोपर्यंत आजाराचे अचूक निदान होत नाही, तोपर्यंत योग्य उपचार सुरू करता येत नाहीत.
• म्हणूनच 2026 मध्ये 'लवकर निदाना'वर (Early Diagnosis) संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• जागतिक हिमोफिलिया दिन — 17 एप्रिल
• सुरुवात — 1989
• आयोजन — World Federation of Hemophilia (स्थापना 1963)
• संस्थापक — फ्रँक श्नॅबेल (Frank Schnabel)
• 17 एप्रिल — फ्रँक श्नॅबेल यांचा जन्मदिवस
• हिमोफिलिया — अनुवांशिक रक्तस्त्राव विकार
• मुख्य समस्या — रक्त गोठण्याची क्षमता कमी
• 2026 थीम — “निदान : काळजीची पहिली पायरी” (“Diagnosis: First Step to Care”)











