
चालू घडामोडी | 🇮🇳 भारताची अक्षय ऊर्जा (Renewable Energy) क्षेत्रात जागतिक झेप!
🇮🇳 India's Global Leap in the Renewable Energy Sector
📚 Subject : GS - पर्यावरण, रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) अलिकडेच सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये (Renewable Energy Capacity) भारताचा जागतिक क्रमांक कितवा झाला आहे ?
1. पहिला
2. दुसरा
3. तिसरा
4. चौथा
उत्तर : तिसरा
📰 बातमी काय ?
• केंद्रीय नवीन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाच्या (Ministry of New and Renewable Energy) माहितीनुसार भारताने अक्षय ऊर्जा (Renewable Energy) स्थापित करण्याच्या बाबतीत ब्राझीलला मागे टाकून जागतिक स्तरावर 3 रे स्थान पटकावले आहे.
✍️ जागतिक क्रमवारी -
• गेल्या काही वर्षांत भारताने सौर, पवन आणि इतर स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे.
• यामुळे भारत आता 1) चीन, 2)अमेरिका यानंतर जगातील तिसरा सर्वात मोठा नवीकरणीय ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.
📊 आकडेवारी आणि प्रगती :
1) एकूण क्षमता - भारताची एकूण अ-जीवाश्म (Non-fossil) स्थापित क्षमता 283.5 GW वर पोहोचली आहे.
2) वार्षिक वृद्धी - 2025-26 या वर्षात 55.3 GW क्षमतेची भर पडली, ही भारतातील आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक वाढ मानली जाते.
3) रुफटॉप सोलर -
• या वाढीमध्ये Rooftop Solar चा मोठा वाटा आहे.
• सुमारे 8.7 GW क्षमता घरगुती आणि व्यावसायिक rooftop solar (छतावरील सौरऊर्जा) प्रणालीमधून वाढली आहे.
4) नवीकरणीय ऊर्जा योगदान -
• एका टप्प्यावर भारतातील एकूण वीज निर्मितीपैकी 51.5% वीज नवीकरणीय ऊर्जेतून निर्माण झाली.
• ही भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील मोठी कामगिरी मानली जाते.
✍️ Static GS Alert (सिलॅबस कनेक्ट):
• व्याख्या : अक्षय ऊर्जा म्हणजे निसर्गातील कधीही न संपणारे स्रोत (सौर, पवन, जलविद्युत इ.).
• नवीकरणीय ऊर्जा उत्पादक जागतिक क्रमवारी - 1) चीन, 2) अमेरिका, 3) भारत 4) ब्राझील
• लक्ष्य (Target) - भारताने 2030 पर्यंत 500GW अक्षय ऊर्जेचे उद्दिष्ट ठेवले आहे.
• पंचामृत ध्येय - COP26 मध्ये भारताने 2070 पर्यंत 'नेट झिरो' (Net Zero) होण्याचे आश्वासन दिले आहे.
🎯 या यशाचे महत्त्व :
• ऊर्जा सुरक्षा - कोळसा आणि तेलावरील अवलंबित्व कमी होईल.
• पर्यावरण रक्षण - कार्बन उत्सर्जन कमी होऊन हवामान बदलाशी लढण्यास मदत होईल.
• ग्रामीण विकास - 'पीएम-सूर्य घर' योजनेमुळे घराघरात सौर ऊर्जा पोहोचत आहे.
🔑 परीक्षेसाठी IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भारताचा जागतिक क्रमांक — 3 रा
• कोणाला मागे टाकले ? - ब्राझीलला
• एकूण अ-जीवाश्म (Non-Fossil) क्षमता — 283.5 GW
• 2025–26 वाढ — 55.3 GW
• Rooftop Solar चा वाटा — 8.7 GW













