
चालू घडामोडी | ९वी 'हिंदी महासागर परिषद
9th Indian Ocean Conference
📚 Subject : GS - जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 9व्या 'हिंदी महासागर परिषदे'चे आयोजन नुकतेच कोणत्या देशात करण्यात आले ?
1. मालदीव
2. भारत
3. श्रीलंका
4. मॉरिशस
उत्तर : मॉरिशस
📰 बातमी काय ?
• मॉरिशसमध्ये पार पडलेल्या 9 व्या हिंदी महासागर परिषदेत भारताने पश्चिम आशियातील संघर्षावर चिंता व्यक्त केली आणि हिंदी महासागर क्षेत्रात शांतता, सुरक्षित सागरी वाहतूक आणि स्थिरतेची गरज अधोरेखित केली.
• ठिकाण - 9 वी हिंदी महासागर परिषद मॉरिशस येथे पार पडली.
🌊 हिंदी महासागर परिषद (Indian Ocean Conference) म्हणजे काय ?
• हिंदी महासागर परिषद ही हिंदी महासागर क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रादेशिक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय परिषद आहे.
• ही परिषद 2016 मध्ये सुरूवात 'इंडिया फाउंडेशन' आणि विविध प्रादेशिक थिंक टँक यांच्या सहकार्याने करण्यात आली.
• स्वरूप - हे हिंदी महासागर क्षेत्रातील (IOR) 40 हून अधिक देशांचे एक महत्त्वाचे सल्लागार व्यासपीठ आहे.
🎯 परिषदेचा मुख्य उद्देश काय आहे ?
• हिंद महासागर क्षेत्रातील सागरी सुरक्षा, व्यापार, ऊर्जा पुरवठा, प्रादेशिक सहकार्य या विषयांवर समन्वय वाढवणे हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
✍️ हिंदी महासागर क्षेत्राचे (IOR) महत्त्व :
1) व्याप्ती -
• हिंदी महासागर क्षेत्र आफ्रिका ते ऑस्ट्रेलिया पर्यंत पसरलेले असून जगातील जवळपास 20% जलक्षेत्र व्यापते.
• 70 दशलक्ष चौ. किमी पेक्षा जास्त क्षेत्र
2) लोकसंख्या -
• जगातील सुमारे 40% लोकसंख्या या क्षेत्रातील 35 हून अधिक किनारी देशांमध्ये राहते.
3) व्यापार केंद्र -
• जगातील निम्मी कंटेनर जहाजे, एक तृतीयांश (1/3) बल्क कार्गो आणि दोन तृतीयांश (2/3) तेल वाहतूक याच क्षेत्रातून होते.
4) भारताची भूमिका -
• भारत या क्षेत्रात 'प्रमुख सुरक्षा पुरवठादार' (Net Security Provider) आणि प्रमुख स्थिर शक्ती म्हणून काम करतो.
• ही परिषद भारताच्या SAGAR (Security and Growth for All in the Region) या दृष्टिकोनावर आधारित आहे.
9 व्या हिंदी महासागर परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे व राजकीय घडामोडी :
1) पश्चिम आशिया संघर्ष -
• भारताने पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षावर चिंता व्यक्त केली.
• नागरी पायाभूत सुविधा आणि व्यापारी जहाजांवरील हल्ल्यांना कडक विरोध दर्शवला.
2) ऊर्जा सुरक्षा - संघर्षामुळे ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि खत पुरवठा साखळीवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा करण्यात आली.
3) मालदीवची अनुपस्थिती - छागोस बेटांच्या (Chagos Islands) प्रादेशिक वादामुळे मॉरिशस आणि मालदीवचे राजनैतिक संबंध स्थगित असल्याने मालदीवचा कोणताही प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित नव्हता.
4) SAARC चे पुनरुज्जीवन - बांगलादेशने प्रादेशिक सहकार्य मजबूत करण्यासाठी 'सार्क' (SAARC) संघटनेला पुन्हा सक्रिय करण्यावर भर दिला.
🤝 भारत-मॉरिशस ऊर्जा करार :
• प्रादेशिक अस्थिरतेपासून संरक्षण मिळवण्यासाठी भारत मॉरिशसला तेल आणि गॅस पुरवठा करण्यासाठी एक अंतिम करार करत आहे. यामुळे मॉरिशसची ऊर्जा सुरक्षा बळकट होईल.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Indian Ocean Conference
• 9 वी हिंदी महासागर परिषद — 2026
• यजमान देश — मॉरिशस
• फोकस — सागरी सुरक्षा व प्रादेशिक सहकार्य
• भारत–मॉरिशस — ऊर्जा सहकार्य (Oil & Gas Pact)
• बांगलादेश भूमिका — SAARC पुनरुज्जीवनाची मागणी
• गैरहजर देश — मालदीव


















