
चालू घडामोडी | IUCN ने एम्परर पेंग्विनला 'संकटग्रस्त' प्रजाती म्हणून घोषित केले
Emperor Penguin Declared as Endangered by IUCN
📚 Subject : GS - पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘सेंटिनल प्रजाती’ (Sentinel Species) म्हणून अलीकडे चर्चेत असलेला एम्परर पेंग्विन (Emperor Penguin) कोणत्या खंडाशी संबंधित आहे ?
1. आफ्रिका
2. आर्क्टिक
3. अंटार्क्टिका
4. ऑस्ट्रेलिया
उत्तर : अंटार्क्टिका
📰 बातमी काय ?
• 'इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' (IUCN) ने एम्परर पेंग्विनला 'संकटग्रस्त' (Endangered) प्रजाती म्हणून घोषित केले आहे.
• हे पेंग्विन अंटार्क्टिका मधील हवामान बदलाचे संकेत देणारी प्रमुख प्रजाती (‘Sentinel Species’) मानले जातात.
🐧 एम्परर पेंग्विन (Emperor Penguin) बद्दल परीक्षेसाठी IMP माहिती :
• एम्परर पेंग्विन ही जगातील सर्वात मोठी आणि वजनाने सर्वात जड पेंग्विन प्रजाती आहे.
• यांच्या मान आणि छातीवर दिसणारी सोनेरी-केशरी रंगाची पट्टी हे त्यांचे विशेष वैशिष्ट्य आहे.
• ही प्रजाती अंटार्क्टिकामध्ये अत्यंत कठीण हवामानात जीवन जगते.
🧭 एम्परर पेंग्विन (Emperor Penguin) ची वैशिष्ट्ये :
✍️ या पेंग्विनमध्ये अत्यंत आश्चर्यकारक जैविक अनुकूलता (Adaptations) आढळतात -
• हे सूर्याची दिशा, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र आणि स्मरणशक्ती वापरून लांब अंतराचा मार्ग शोधतात.
• प्रजननासाठी (Breeding) मादी अंटार्क्टिकाच्या अत्यंत थंड हिवाळ्यात अंडी घालतात.
• मादी अंडी घालून अन्नाच्या शोधात समुद्रात जाते,
• तर नर पेंग्विन जवळपास दोन महिने अंडे आपल्या पायांवर ठेवून उबवतो आणि या काळात तो अन्न खात नाही.
• उबदार राहण्याची पद्धत (Huddling): -40°C पेक्षा कमी तापमानात हे पेंग्विन एकमेकांना चिटकून उभे राहतात आणि गोलाकार फिरतात, जेणेकरून प्रत्येकाला मधल्या उबदार भागात जाता येईल.
🌍 हवामान बदलाचा परिणाम :
• एम्परर पेंग्विन जगण्यासाठी आणि प्रजननासाठी पूर्णपणे 'समुद्रातील बर्फावर' (Sea Ice) अवलंबून असतात.
• हा बर्फ वितळल्यास त्यांचे निवासस्थान, शिकार क्षेत्र, प्रजनन प्रक्रिया यावर गंभीर परिणाम होतो.
• जागतिक तापमानवाढ कायम राहिल्यास 2080 पर्यंत त्यांच्या लोकसंख्येत सुमारे 50% घट होण्याची शक्यता आहे.
सेंटिनल प्रजाती म्हणजे काय ?
What are Sentinel Species?
• सेंटिनल प्रजाती म्हणजे अशा प्रजाती ज्यांच्या आरोग्यावरून संपूर्ण परिसंस्थेच्या (Ecosystem) स्थितीचा अंदाज येतो.
• पर्यावरणातील प्रदूषण किंवा हवामान बदलाचा परिणाम या जीवांवर सर्वात आधी आणि स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामुळे मानवाला पुढील धोक्याची पूर्वसूचना मिळते.
• या प्रजाती पर्यावरणातील बदलांना लवकर प्रतिसाद देतात, त्यामुळे त्या “Early Warning System” म्हणून काम करतात.
✍️ सेंटिनल प्रजाती ची (Sentinel Species) उदाहरणे -
• 'कॅनरी' पक्षी - पूर्वी खाणींमध्ये कार्बन मोनोऑक्साइड वायू ओळखण्यासाठी 'कॅनरी' पक्ष्यांचा वापर केला जात असे.
• बेडूक - यांच्या पारदर्शक त्वचेमुळे ते प्रदूषणास अत्यंत संवेदनशील असतात.
• मधमाश्या - रासायनिक कीटकनाशकांचा परिणाम दर्शवतात
• ध्रुवीय अस्वल (Polar Bear) - आर्क्टिकमधील प्रदूषणाचे संकेत देतात.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Emperor Penguin
• एम्परर पेंग्विन — जगातील सर्वात मोठा पेंग्विन
• अधिवास — अंटार्क्टिका
• IUCN दर्जा — 'संकटग्रस्त' (Endangered)
• जीवन आणि प्रजनन — समुद्रातील बर्फावर' अवलंबून
• Sentinel Species — पर्यावरणीय बदलांचे संकेत देणारी प्रजाती

















