
चालू घडामोडी | 'दस्टलिक' संयुक्त लष्करी युद्धाभ्यास - 2026

Exercise DUSTLIK - 2026
📚 Subject : GS - संरक्षण - युद्ध सराव
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'दस्टलिक'( ‘DUSTLIK’) हा संयुक्त लष्करी युद्धाभ्यास भारत कोणत्या देशासोबत आयोजित करतो ?
1. कझाकिस्तान
2. किर्गिझस्तान
3. ताजिकिस्तान
4. उझबेकिस्तान
उत्तर : उझबेकिस्तान
📰 बातमी काय ?
• भारतीय सशस्त्र दल 7व्या 'दस्टलिक'( ‘DUSTLIK’) संयुक्त लष्करी सरावात सहभागी होणार असून हा सराव उझबेकिस्तानमधील नामंगन येथे आयोजित केला जात आहे.
⚔️ ‘DUSTLIK’ सराव कोणासोबत असतो ? त्याची सुरुवात केव्हा झाली ?
• प्रकार - हा भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील वार्षिक (दरवर्षी होणारा) द्विपक्षीय युद्धाभ्यास आहे.
• सुरुवात - या युद्धाभ्यासाची पहिली आवृत्ती 2019 मध्ये पार पडली होती.
• स्वरूप - हा सराव आळीपाळीने एकदा भारतात आणि एकदा उझबेकिस्तानमध्ये आयोजित केला जातो.
• 2026 ची विशेष बाब - या वर्षीच्या (2026) सरावात विशेष म्हणजे तीनही सैन्यदलांचा (Tri-Services) सहभाग आहे, ज्यामुळे संयुक्त कारवाई (Joint Operations) अधिक प्रभावी बनवण्यावर भर दिला जात आहे.
🎯 सरावाचा उद्देश काय आहे ?
• या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य वाढवणे आणि संयुक्त लष्करी क्षमता मजबूत करणे.
• विशेषतः अर्ध-डोंगराळ भागात (Semi-Mountain Terrain) कारवाई करण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
• यामध्ये
👉 संयुक्त टॅक्टिकल ड्रिल्स
👉 स्ट्राईक ऑपरेशन्स
👉 नकाशा वाचन (Land Navigation)
👉 दहशतवादी गटांचे निर्मूलन (Counter-Terror Operations) - यांचा समावेश असतो.
🌍 उझबेकिस्तान देशाबद्दल थोडक्यात माहिती :
• स्थान - हा मध्य आशियातील एक 'लँडलॉक' (Landlocked) देश आहे.
• दोनदा लँडलॉक (Doubly Landlocked): उझबेकिस्तान हा जगातील अशा दोन देशांपैकी एक आहे जे 'दोनदा लँडलॉक' आहेत - म्हणजेच या देशाच्या शेजारील सर्व देश सुद्धा लँडलॉक आहेत. (दुसरा असा देश लिश्टनस्टाइन (Liechtenstein) आहे.)
• सीमा - कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान.
🖌️ राजधानी - ताश्कंद

🔗 ऐतिहासिक संदर्भ ताश्कंद करार :
• भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे 11 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद येथे निधन झाले.
• 10 जानेवारी 1966 रोजी ताश्कंद शहरात शांतता करारावर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांचे निधन झाले.
• हे भारताचे पहिले असे पंतप्रधान होते की त्यांचे निधन भारताच्या बाहेर झाले.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• DUSTLIK — भारत–उझबेकिस्तान संयुक्त सराव
• सुरुवात — 2019
• स्वरूप — वार्षिक / आलटून-पालटून आयोजन
• 2026 - 7 वी आवृत्ती : नामंगन (उझबेकिस्तान)
• 2026 वैशिष्ट्य — तीनही सैन्यदलांचा सहभाग

















