
चालू घडामोडी | आर्टेमिस II मोहीम
आर्टेमिस II मोहीम
Artemis II Mission
📚 Subject : GS - विज्ञान आणि तंत्रज्ञान
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) आर्टेमिस II या मोहिमेबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
1. 1972 नंतर ही नासाची पहिली मानवी चंद्र मोहीम आहे.
2. या मोहिमेत एकूण 4 अंतराळवीर सहभागी आहेत.
3. यात रशियाच्या 'रोसकॉसमॉस' संस्थेचा सहभाग आहे.
4. या मोहिमेने अपोलो 13 चा विक्रम मोडीत काढला आहे.
उत्तर : यात रशियाच्या🇷🇺'रोसकॉसमॉस' संस्थेचा सहभाग आहे. - हे विधान चुकीचे आहे.
• स्पष्टीकरण - यात नासा आणि कॅनडा यांचा सहभाग आहे, रशियाचा नाही.
📰 बातमी काय ?
• NASA च्या आर्टेमिस II (Artemis II) मोहिमेने मानवाने अंतराळात केलेल्या सर्वाधिक अंतराचा नवीन विक्रम नोंदवला आहे.
• या मोहिमेत अंतराळवीरांनी पृथ्वीपासून सुमारे 252,756 मैल अंतर गाठले, जे 1970 मधील Apollo 13 च्या विक्रमापेक्षा जास्त आहे.
• ही मोहीम मानवाला पुन्हा चंद्राभोवती घेऊन जाणारी एक महत्त्वाची पायरी मानली जाते.
🚀 Artemis II म्हणजे काय ?
• Artemis II ही मानवासह चंद्राभोवती जाणारी मोहीम असून ती Artemis कार्यक्रमातील पहिली Crewed Flight आहे.
• Apollo 17 (1972) नंतरची ही पहिली मानवी चंद्राभोवतीची मोहीम आहे, त्यामुळे तिचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.
👨🚀 मोहिमेची रचना आणि सहकार्य :
• या मोहिमेत एकूण 4 अंतराळवीर आहेत.
• यामध्ये 3 अंतराळवीर NASA कडून आणि 1 अंतराळवीर कॅनडियन स्पेस एजन्सी (Canadian Space Agency) सहभागी झाले आहे.
🛰️ मिशन कसे कार्य करते ?
• प्रक्षेपण (Launch) - ही मोहीम Space Launch System (SLS) रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आली.
• अंतराळयान (Spacecraft) - या मोहिमेत Orion Spacecraft वापरले गेले आहे, जे भविष्यातील Deep Space Missions साठी तयार केलेले आहे.
• मार्ग (Trajectory) - ही मोहीम 'फ्री-रिटर्न लूनर फ्लायबाय' (Free-Return Trajectory) वापरते, म्हणजेच यान चंद्राभोवती फिरून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत येते.

🌕 मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे कोणते ?
1) चंद्राच्या अत्यंत जवळून प्रवास (~4067 मैल) :
• हे यान चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 4067 मैल (सुमारे 6545 किमी) अंतरावरून जाईल.
• महत्त्व - इतक्या जवळून प्रवास केल्यामुळे चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यानाला पृथ्वीकडे वळणे (U-Turn घेणे) सोपे जाते. यामुळे इंधनाची बचत होते.
2) चंद्राच्या 'पलीकडील' भागाचे निरीक्षण (Observation of Moon’s Far Side):
• चंद्राची एक बाजू पृथ्वीवरून कधीच दिसत नाही, तिला 'Far Side' किंवा 'डार्क साईड' म्हणतात.
• महत्त्व - आर्टेमिस 2 मधील अंतराळवीर स्वतःच्या डोळ्यांनी हा भाग पाहणारे 50 वर्षांनंतरचे पहिले मानव असतील.
• या भागातील विवरे (Craters) आणि भूभागाचा अभ्यास भविष्यातील लँडिंगसाठी महत्त्वाचा आहे.
3) अंतराळातील सूर्यग्रहण (Solar Eclipse) :
• प्रवासादरम्यान एक असा टप्पा येईल जिथे पृथ्वी, चंद्र आणि सूर्य एका रेषेत येतील.
• महत्त्व - अंतराळवीरांना पृथ्वीच्या वातावरणातून दिसणाऱ्या ग्रहणापेक्षा वेगळे, अंतराळातून दिसणारे विलोभनीय सूर्यग्रहण पाहता येईल.
• या काळात सौर ऊर्जेवर (Solar Panels) होणारा परिणाम अभ्यासला जाईल.
4) नियोजित 'कम्युनिकेशन ब्लॅकआउट' (Planned Communication Blackout) :
• जेव्हा ओरियन यान चंद्राच्या 'Far Side' ला (मागच्या बाजूला) जाईल, तेव्हा चंद्राचा मोठा आकार पृथ्वी आणि यान यांच्यामध्ये येईल. यामुळे रेडिओ लहरी अडथळल्या जातील.
• महत्त्व - या काळात काही मिनिटांसाठी पृथ्वीवरील नियंत्रण कक्षाशी (NASA Control Room) संपर्क पूर्णपणे तुटेल.
• अंतराळवीरांना पूर्णपणे 'ऑटोमॅटिक' यंत्रणेवर अवलंबून राहावे लागेल.
• ही कोणत्याही अंतराळ मोहिमेतील सर्वात तणावपूर्ण पण महत्त्वाची वेळ असते.
🌍 या मोहिमेचे महत्त्व काय ?
• भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी पाया - या मोहिमेतून मिळालेली माहिती (Images, Telemetry) भविष्यातील Artemis Missions साठी उपयोगी ठरणार आहे.
• मानवाचे चंद्रावर पुनरागमन - ही मोहीम भविष्यातील चंद्रावर Landing (Artemis III) साठी Groundwork तयार करते.
• दीर्घकालीन उपस्थिती - चंद्रावर दीर्घकालीन मानवी उपस्थिती निर्माण करण्याच्या दिशेने ही एक महत्त्वाची पायरी आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• Artemis II: NASA ची Crewed Lunar Flyby Mission
• विक्रम: ~252,756 मैल (Apollo 13 पेक्षा जास्त)
• अंतराळयान : Orion
• रॉकेट: Space Launch System (SLS)
• सहकार्य: NASA + Canadian Space Agency
• वैशिष्ट्य: Free-Return Trajectory















