
चालू घडामोडी | जागतिक आरोग्य दिन
World Health Day
📚 Subject : GS - दिनविशेष, जागतिक संघटना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) दरवर्षी "जागतिक आरोग्य दिन" केव्हा साजरा केला जातो ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस भरती, मुंबई पोलीस 2017, SSC CHSL 2021, RRB 2019,...)
1. 7 मार्च
2. 7 एप्रिल
3. 7 मे
4. 7 जून
उत्तर : 7 एप्रिल
✅ जागतिक आरोग्य दिना बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• दरवर्षी जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.
• जगभरात आरोग्य समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना निरोगी जीवन जगण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल या दिवशी का साजरा करतात ?
• 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची (World Health Organization (WHO)) स्थापना झाली.
• या दिनाचे महत्त्व ओळखून जागतिक आरोग्य संघटनेचा वर्धापन दिन म्हणून दरवर्षी 7 एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो.
✍️ पहिला जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरी करण्यात आला ?
• 7 एप्रिल 1950 रोजी पहिल्यांदा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
🛡️ जागतिक आरोग्य दिन 2026 ची संकल्पना (थीम) कोणती ?
• “आरोग्यासाठी एकत्र : विज्ञाना सोबत उभे” (“Together for Health: Stand with Science”) ही जागतिक आरोग्य दिन 2026 ची संकल्पना आहे.
• यंदाची संकल्पना जागतिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी विज्ञान-आधारित उपायांचे महत्त्व अधोरेखित करते.
✅ जागतिक आरोग्य संघटने बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
🧐 जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केव्हा करण्यात आली ?
• 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटना म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) या संघटनेची स्थापना झाली.
• जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात सुसंवादाचे कार्य करणारी संयुक्त राष्ट्रांची (United Nations) एक विशेष संस्था आहे.
• मुख्य कार्य : WHO चे मुख्य कार्य म्हणजे जगभरातील लोकांचे आरोग्य सुधारणे आणि आरोग्यविषयक समस्यांवर उपाय शोधणे.
🧐 जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय (Headquarters) कोठे आहे ?
(सरळसेवा भरती, महाराष्ट्र पोलीस, आरोग्यसेवा भरती, NTPC 2021, ....)
(नोट : खूप वेळा, आणि जवळ जवळ सर्वच परीक्षांत विचारलेला प्रश्न)
उत्तर : स्वित्झर्लंड (Switzerland) देशातील जिनेव्हा (Geneva) या शहरात जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) मुख्यालय आहे.













