
चालू घडामोडी | NCERT आता पदवी देणार!
NCERT Granted Deemed University Status
📚 Subject : GS
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) NCERT ला नुकताच कोणता दर्जा बहाल करण्यात आला आहे ?
1. स्वायत्त संस्था
2. अभिमत विद्यापीठ
3. केंद्रीय विद्यापीठ
4. राज्य विद्यापीठ
उत्तर : अभिमत विद्यापीठ (Deemed to be University)
📰 बातमी काय ?
• केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेला (NCERT) 'विशिष्ट श्रेणी' अंतर्गत 'अभिमत विद्यापीठ' (Institution deemed to be University under distinct category) म्हणून मान्यता दिली आहे.
• यामुळे NCERT च्या शैक्षणिक अधिकारात मोठी वाढ झाली आहे.
⚙️ या दर्जानंतर काय बदल होणार आहेत ?
1)पदवी प्रदान करण्याचा अधिकार (Degree-Granting Authority):
• या नवीन दर्जामुळे आता NCERT आणि तिच्या 6 प्रादेशिक संस्था (Regional Institutes) स्वतंत्रपणे स्वतःचे पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट (PhD) अभ्यासक्रम सुरू करू शकतील आणि विद्यार्थ्यांना अधिकृत पदव्या प्रदान करू शकतील.
2)नियामक अनुपालन (Regulatory Compliance):
• NCERT ला आपले सर्व शैक्षणिक कार्यक्रम विद्यापीठ अनुदान आयोग ( University Grants Commission - UGC) च्या मानकांनुसार आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या उद्दिष्टांशी सुसंगत ठेवावे लागतील.
3) शैक्षणिक विस्तार आणि संशोधन :
• NCERT आता नवीन संशोधन प्रकल्प, पीएच.डी. कार्यक्रम आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्यास बांधील आहे.
• तसेच, UGC च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ती भारताबाहेर (Offshore) किंवा देशात इतर ठिकाणी आपली उप-केंद्रे (campus) स्थापन करू शकते.
इतर महत्त्वाच्या अटी :
• नफा न मिळवणे (Non-Profit) - ही संस्था कोणत्याही व्यावसायिक किंवा नफा मिळवण्याच्या हेतूने चालवल्या जाणाऱ्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होऊ शकत नाही.
• मान्यता (Accreditation) - संस्थेला NAAC (National Assessment and Accreditation Council - NAAC) कडून संस्थात्मक मानांकन आणि National Board of Accreditation (NBA) कडून विशिष्ट कार्यक्रमांचे रेटिंग मिळवणे अनिवार्य आहे.
• राष्ट्रीय रँकिंग (NIRF) - आता NCERT ला दरवर्षी NIRF (National Institutional Ranking Framework) रँकिंगमध्ये सहभागी व्हावे लागेल.
• डिजिटल एकत्रीकरण (ABC) - संस्थेला 'ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स' (ABC) प्रणालीचा अवलंब करणे अनिवार्य आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे क्रेडिट स्कोअर डिजिटल लॉकरमध्ये साठवले जातील.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : NCERT
• नवा दर्जा : केंद्र सरकारकडून 'अभिमत विद्यापीठ' (Deemed University) म्हणून मान्यता.
• अधिकार : स्वतःचे स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करणे आणि पदवी (Degree) देण्याचा अधिकार.
• व्याप्ती : NCERT मुख्यालय आणि त्यांच्या 6 प्रादेशिक संस्था (RIE) यांना दर्जा लागू.
• नियमन: UGC चे निकष आणि NEP 2020 शी सुसंगत कार्यप्रणाली अनिवार्य.
• मर्यादा: केवळ 'नफा-रहित' (Non-Profit) तत्त्वावर कामकाज; व्यावसायिक हेतूंना मनाई.















