
चालू घडामोडी | सम्राट सम्प्रती
Samrat Samprati
📚 Subject : GS - प्राचीन भारताचा इतिहास
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘सम्राट सम्प्रती’ प्रामुख्याने कोणत्या धर्माच्या प्रसारासाठी ओळखले जातात ?
1. जैन धर्म
2. बौद्ध धर्म
3. हिंदू धर्म
4. शीख धर्म
उत्तर : जैन धर्म
📰 बातमी काय ?
• पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘महावीर जयंती’च्या निमित्ताने गुजरातमधील कोबा, गांधीनगर येथे ‘सम्राट सम्प्रती’ संग्रहालयाचे उद्घाटन केले.

👑 सम्राट सम्प्रती कोण होते ?
• सम्राट सम्प्रती हे मौर्य साम्राज्याचे पाचवे सम्राट होते.
• ते महान सम्राट अशोक यांचे नातू आणि सम्राट कुणाल यांचे पुत्र होते.
• सम्राट अशोक यांच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्य त्यांच्या नातवांमध्ये विभागले गेले, त्यामध्ये सम्राट सम्प्रती यांचाही समावेश होता.
📜 धार्मिक भूमिका आणि ओळख :
• मौर्य काळात विविध धर्मांना महत्त्व मिळाले होते.
• जसे चंद्रगुप्त मौर्य जैन धर्माशी, सम्राट अशोक बौद्ध धर्माशी संबंधित होते, तसेच सम्राट सम्प्रती हे जैन धर्माच्या प्रसारासाठी ओळखले जातात.
• सम्राट सम्प्रती यांना अनेकदा “जैन धर्माचे अशोक” (Jain Ashoka) असेही म्हटले जाते.
🛕 सम्राट सम्प्रती यांचे जैन धर्माच्या प्रसारातील योगदान :
• सम्राट सम्प्रती यांनी जैन धर्माचा प्रसार केवळ विचारांपुरता मर्यादित ठेवला नाही, तर त्याला भौतिक स्वरूप दिले.
• त्यांनी भारतातील अनेक भागांमध्ये जैन धर्म रुजवण्यासाठी सक्रिय प्रयत्न केले.
• विशेषतः आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या भागांमध्ये जैन धर्माचा प्रभाव वाढवण्यात त्यांची मोठी भूमिका होती.
• यासोबतच, परंपरागत जैन ग्रंथांनुसार त्यांनी सुमारे 1,25,000 नवीन जैन मंदिरे (Derasars) बांधली आणि 36,000 जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन केले.
• यामुळे जैन धर्माला एक स्थिर आणि दृश्यमान ओळख मिळाली.
🌍 या संग्रहालयाचे महत्त्व :
• गांधीनगर येथील ‘सम्राट सम्प्रती संग्रहालय’ हे जैन इतिहास आणि संस्कृती जतन करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
• यामुळे -
👉 जैन धर्माच्या इतिहासाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल
👉 सम्राट सम्प्रती यांच्या कार्याची जाणीव वाढेल
👉 सांस्कृतिक वारसा जपण्यास मदत होईल
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : सम्राट सम्प्रती
• सम्राट सम्प्रती — मौर्य सम्राट (सम्राटअशोक यांचे नातू)
• कालखंड — सु. 224–215 BCE
• धर्म — जैन धर्म (श्वेतांबर परंपरा)
• उपाधी — “जैन धर्माचे अशोक”
• कार्य — जैन धर्माचा व्यापक प्रसार
• मंदिरे — 1,25,000 नवीन + 36,000 पुनरुज्जीवित













