
चालू घडामोडी | हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान

Hindu Hruday Samrat Balasaheb Thackeray Nagri Lokkalyan Abhiyan
📚 Subject : GS - सरकारी योजना - उपक्रम
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ ही योजना कशाशी संबंधित आहे ?
1. आरोग्य पायाभूत सुविधा विकास
2. झोपडपट्टी पुनर्विकास व नियोजित गृहनिर्माण
3. डिजिटल प्रशासन सुधारणा
4. पर्यावरण संरक्षण व हरित क्षेत्र वाढ
उत्तर : झोपडपट्टी पुनर्विकास व नियोजित गृहनिर्माण
📰 बातमी काय ?
• महाराष्ट्र सरकारने ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान’ जाहीर केले.
• या अभियानाचा मुख्य उद्देश मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करणे हा आहे.
🤔 हे अभियान नेमकं कशासाठी आहे ?
• मुंबईसारख्या महानगरात झोपडपट्ट्यांची समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित, सुसज्ज आणि नियोजित घरे उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
• या मोहिमेद्वारे एकीकडे झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास वेगाने केला जाणार आहे, तर दुसरीकडे ‘नेत्रम’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन झोपड्या निर्माण होऊ नयेत यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.
🧐 पुनर्विकास कसा केला जाणार ?
• या अभियानात झोपडपट्ट्यांचा स्वतंत्रपणे नव्हे तर समूह पातळीवर (Cluster) पुनर्विकास केला जाणार आहे.
• किमान 50 एकर क्षेत्र आणि 51% पेक्षा जास्त झोपडपट्टी असलेल्या भागांचा समावेश करण्यात येईल.
• यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) मार्फत ‘स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम’ राबवली जाणार आहे.
• रहिवाशांची अचूक नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षण केले जाईल.
🏠 घरांच्या बाबतीत काय बदल करण्यात आला ?
• पूर्वी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 180, 225 व 269 चौ.फुट क्षेत्रफळाच्या सदनिका दिल्या जात होत्या.
• मात्र आता या अभियानांतर्गत 300 चौ.फुट क्षेत्रफळाच्या सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
• यामुळे नागरिकांना अधिक चांगल्या दर्जाचे आणि मोठे घर मिळणार आहे.
🛰️ ‘नेत्रम’ (NETRAM) तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे ?
• या अभियानातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘नेत्रम’ तंत्रज्ञानाचा वापर.
• या तंत्रज्ञानात उपग्रह प्रतिमा (Satellite Images), GIS प्रणाली आणि डिजिटल डेटा यांचा वापर केला जातो.
• दर चार महिन्यांनी उपग्रह प्रतिमांचे विश्लेषण करून नवीन झोपड्या उभारल्या जात आहेत का यावर लक्ष ठेवले जाते.
• BISAG-N या संस्थेच्या वेब-पोर्टलद्वारे ही माहिती संबंधित यंत्रणांना दिली जाते.
• त्यामुळे नवीन झोपडपट्ट्या निर्माण होण्यापूर्वीच त्यावर कारवाई करता येते.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• अभियान → हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान
• उद्देश → झोपडपट्टीमुक्त शहर
• पद्धत → क्लस्टर पुनर्विकास
• घराचा आकार → 300 चौ.फुट
• तंत्रज्ञान → नेत्रम (उपग्रह + GIS)
• फोकस → पुनर्विकास + नवीन झोपड्या रोखणे

















