
चालू घडामोडी | आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस

International Zero Waste Day
📚 Subject : GS - दिनविशेष, पर्यावरण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' (International Zero Waste Day ) कधी साजरा केला जातो ?
1. 8 मार्च
2. 30 मार्च
3. 2 एप्रिल
4. 5 जून
उत्तर : 30 मार्च
• जगभरात दरवर्षी 30 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस (International Zero Waste Day) म्हणून साजरा करतात.
🤔 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' का साजरी करतात ?
• दरवर्षी, जगात 2.1 अब्ज ते 2.3 अब्ज टन घनकचरा निर्माण होतो.
• यात कापड आणि पॅकेजिंगपासून ते इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक आणि अन्नापर्यंत कचऱ्याचा समावेश आहे.
• जागतिक कचरा व्यवस्थापन सेवा या प्रचंड कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अपुरी आहेत.
• जगभरात 2.7 अब्ज लोकांना घनकचरा संकलनाची सुविधा उपलब्ध नाही आणि ते विल्हेवाटीसाठी खुल्या डंपसाईट्सवर अवलंबून आहेत.
• कचरा कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी
कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' साजरा करतात.
• जागतिक स्तरावर कचरा व्यवस्थापनाला चालना देण्याचे महत्त्व आणि शाश्वत उपभोग आणि उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता या दोन्ही गोष्टींवर हा दिवस प्रकाश टाकतो.
• प्लास्टिक आणि इतर हानिकारक कचरा कमी करण्यासाठी उपाययोजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे, वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे.
• शून्य-कचरा उपक्रम 2030 च्या शाश्वत विकासाच्या (Sustainable Development Goals) अजेंडाशी सुसंगत आहेत.
🤔 आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसाचा ठराव कोणत्या देशाच्या पुढाकाराने मांडण्यात आला ?
• जगभरात शून्य-कचरा उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवसाचा ठराव तुर्की या देशाच्या पुढाकाराने 105 देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला गेला.
• संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 14 डिसेंबर 2022 रोजी हा ठराव मंजूर केला, ज्यामध्ये 30 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस म्हणून घोषित करण्यात आला.
1️⃣ पहिला 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' केव्हा साजरी करण्यात आला ?
• 30 मार्च 2023 रोजी पहिला 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' साजरी करण्यात आला.
'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' 2026 ची संकल्पना थीम काय आहे ?
• 'आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस' 2026 ची मुख्य संकल्पना (थीम) "अन्न नासाडी" (Food Waste) ही आहे.
• 2026 सालासाठी या दिनाचे विशेष लक्ष अन्नाची नासाडी रोखण्यावर केंद्रित करण्यात आले आहे.
• या मोहिमेचा मुख्य संदेश "शून्य कचऱ्याची सुरुवात तुमच्या ताटापासून होते" (Zero waste starts on your plate) हा आहे.

🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : International Zero Waste Day
• आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिवस — 30 मार्च
• संयुक्त राष्ट्रांची मंजूरी — 2022
• ठराव मांडणारा प्रमुख देश — तुर्की
• पहिला शून्य कचरा दिवस — 30 मार्च 2023
• 2026 थीम — Food Waste (अन्न नासाडी रोखणे)

















