
चालू घडामोडी | महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026
Maharashtra Freedom of Religion Bill 2026
📚 Subject : GS - राज्यशास्त्र - कायदे (विधेयक)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026’ चा मुख्य उद्देश काय आहे ?
1. सर्व धर्मांचे प्रचार प्रोत्साहित करणे
2. धार्मिक संस्थांना अनुदान देणे
3. नवीन धार्मिक स्थळांची उभारणी करणे
4. बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे होणारे धर्मांतर रोखणे
उत्तर : बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभनाद्वारे होणारे धर्मांतर रोखणे
📰 बातमी काय ?
• मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विधिमंडळात ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026‘ हे विधेयक मांडले.
• मुख्य उद्देश - बळजबरीने, फसवणुकीने, प्रलोभन दाखवून किंवा विवाहाच्या बहाण्याने केले जाणारे 'बेकायदेशीर धर्मांतर' रोखणे हा या विधेयकाचा मुख्य उद्देश आहे.

महत्त्वाच्या तरतुदी (Key Provisions) :
• पूर्वसूचना (Notice) : धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला आणि धर्मांतर आयोजित करणाऱ्या संस्थेला किमान 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना (District Magistrate) लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे.
• नोंदणी (Registration) : धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे तशी घोषणा (Declaration) करणे आवश्यक आहे.
• बदल्याचा पुरावा (Burden of Proof) : धर्मांतर हे स्वेच्छेने आणि कोणत्याही दबावाशिवाय झाले आहे, हे सिद्ध करण्याची जबाबदारी धर्मांतर करणाऱ्यावर किंवा त्याला मदत करणाऱ्या आरोपीवर असेल.
• तक्रारदार : बेकायदेशीर धर्मांतराबाबतची तक्रार धर्मांतरित व्यक्ती स्वतः, तिचे आई-वडील, भाऊ, बहीण किंवा रक्ताने, विवाहाने अथवा दत्तक विधानाने संबंधित असलेली कोणतीही व्यक्ती पोलीस ठाण्यात नोंदवू शकते.
• गुन्ह्याचे स्वरूप : हे गुन्हे दखलपात्र (Cognisable) आणि अजामीनपात्र (Non-bailable) असतील.
विवाह आणि अपत्य :
• केवळ धर्मांतरासाठी केलेला विवाह न्यायालय अवैध (Null and Void) ठरवू शकते.
• अशा विवादास्पद विवाहातून जन्माला आलेल्या मुलाचा धर्म हा त्याच्या आईच्या लग्नापूर्वीचा मूळ धर्म मानला जाईल.
• या विधेयकाच्या माध्यमातून पीडित व्यक्तींना फक्त न्यायच नाही, तर त्यांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत आणि मुलांच्या ताब्याविषयीचे कायदेशीर संरक्षणही दिले जाणार आहे.
शिक्षा आणि दंड (Penalties) :
1) सर्वसाधारण गुन्हे : बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.
2) अल्पवयीन, महिला आणि SC/ST : जर धर्मांतर करणारी व्यक्ती अल्पवयीन, महिला किंवा अनुसूचित जाती-जमातीमधील असेल, तर 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
3) सामूहिक धर्मांतर : एकाच वेळी दोन किंवा अधिक व्यक्तींचे धर्मांतर केल्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि ₹5 लाख दंड होऊ शकतो.
4) पुनरावृत्ती : वारंवार अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना 10 वर्षांचा तुरुंगवास आणि ₹5 लाख दंडाची शिक्षा आहे.
📖 मूलभूत हक्क - कलम 25 :
• भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचे पालन करण्याचे, आचरण करण्याचे आणि प्रसार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.
• बळजबरीने किंवा फसवणूक करून केलेले धर्मांतर या कलमांतर्गत बेकायदेशीर मानले जाते, केवळ स्वेच्छेने धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे.
⚖️ न्यायालयीन घटला :
• सर्वोच्च न्यायालयाने 'स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश' (1977) खटल्यात (Stanislaus vs State of Madhya Pradesh ,1977 case ) स्पष्ट केले आहे की, धर्माच्या प्रसाराच्या अधिकारात दुसऱ्याचे 'बळजबरीने धर्मांतर' करण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही.
इतर महत्त्वाची माहिती :
• असा कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य नाही.
• यापूर्वी ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक यांसारख्या राज्यांनी अशा प्रकारचे कायदे केले आहेत.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक — 2026
• उद्देश — बळजबरी/फसवणूक धर्मांतर रोखणे
• पूर्वसूचना — 60 दिवस (DM कडे नोटीस)
• नोंदणी — 21 दिवस (घोषणा आवश्यक)
• गुन्हा स्वरूप — दखलपात्र + अजामीनपात्र
• पुराव्याची जबाबदारी — धर्मांतर करणाऱ्यावर
• संविधान आधार — कलम 25 (धर्म स्वातंत्र्य)
• न्यायालयीन निर्णय — 'स्टॅनिस्लॉस विरुद्ध मध्य प्रदेश' (1977) खटला

















