
चालू घडामोडी | तारागिरी (F41)
Taragiri (F41)
📚 Subject : GS - संरक्षण
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) ‘तारागिरी (F41)’ कोणत्या श्रेणीची युद्धनौका आहे ?
1. स्टेल्थ फ्रिगेट
2. डेस्ट्रॉयर
3. एंटी-सबमरीन वॉरफेयर शॅलो वॉटर क्राफ्ट
4. ऑफशोअर पॅट्रोल व्हेसेल
उत्तर : स्टेल्थ फ्रिगेट
📰 बातमी काय ?
• भारतीय नौदल 03 एप्रिल 2026 रोजी ‘तारागिरी (F41)’ या स्टेल्थ फ्रिगेटचे विशाखापट्टणम येथे सेवेत दाखल (Commissioning) करणार आहे.
🤔 ‘तारागिरी (F41)’ काय आहे?
• ‘तारागिरी’ ही Project 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेली एक आधुनिक स्टेल्थ गाइडेड-मिसाइल फ्रिगेट आहे.
• ही युद्धनौक समुद्र, हवा आणि पाण्याखालील (Sub-Surface) धोके ओळखून त्यावर कारवाई करू शकते.
🛡️ फ्रिगेट (Frigate) म्हणजे काय ?
• लांब पल्ल्याच्या ताफा संरक्षणासाठी तयार केलेली बहुउद्देशीय युद्धनौका, जी पृष्ठभाग, आकाश आणि पनडुब्बी या तिन्ही धोक्यांवर काम करू शकते.
🎯 हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे?
• हा प्रकल्प भारताच्या आत्मनिर्भर भारत (Aatmanirbhar Bharat) उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
• यामुळे भारताची संरक्षण क्षेत्रातील आयातीवरील अवलंबित्व कमी होऊन स्वदेशी उत्पादनाला चालना मिळते.
⚙️ बांधकाम आणि स्वदेशीकरण :
• ही युद्धनौक माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड - मुंबई (Mazagon Dock Shipbuilders Limited) येथे तयार करण्यात आली आहे.
• यामध्ये सुमारे 75% स्वदेशी घटक वापरण्यात आले असून 200 पेक्षा जास्त MSMEs यामध्ये सहभागी आहेत.
🚢 ‘तारागिरी (F41)’ स्टेल्थ फ्रिगेटचे मुख्य वैशिष्ट्ये कोणते ?
🛡️ स्टील्थ तंत्रज्ञान :
• प्रगत रडार-शोषक कोटिंग आणि डिझाइनमुळे रडारवर या युद्धनौकेची उपस्थिती ओळखणे शत्रूला कठीण जाते (Reduced Radar Cross Section).
🦾 मोठी क्षमता (~6,670 टन):
• अधिक शस्त्रे, इंधन आणि उपकरणे वाहून नेण्याची क्षमता
🛢️प्रणोदन प्रणाली (Propulsion): CODOG (Combined Diesel or Gas)
• यात डिझेल इंजिनचा वापर इंधन बचतीसाठी आणि गॅस टर्बाइनचा वापर वेगवान हालचालींसाठी केला जातो.
💣 प्रगत शस्त्र प्रणाली :
• प्रगत सोनार यंत्रणा, टॉरपीडो आणि रॉकेट लॉन्चर्स.
🥷🏼 कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम :
• सर्व सेन्सर्स आणि शस्त्रे एकाच इंटरफेसशी जोडलेली असल्याने रिअल-टाइम माहिती आणि जलद निर्णय घेणे शक्य होते.

🎯 या युद्धनौकेचे महत्त्व -
• हिंदी महासागर क्षेत्र (IOR): वाढत्या भौगोलिक स्पर्धेच्या काळात भारताची सागरी सुरक्षा आणि वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी.
• निळी अर्थव्यवस्था (Blue Economy): भारताचा सागरी व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका.
• बहुआयामी भूमिका : केवळ युद्धच नव्हे तर 'मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण' (HADR) मोहिमांसाठीही ही नौका सज्ज आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : Taragiri (F41)
• ‘तारागिरी (F41)’ — स्टेल्थ फ्रिगेट (Project 17A)
• बांधकाम — माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड
• स्वदेशी घटक — ~75%
• क्षमता — ~6,670 टन






















