
चालू घडामोडी | भारत औद्योगिक विकास योजनेला मंजुरी

Bharat Audyogik Vikas Yojna (BHAVYA)
📚 Subject : GS - सरकारी योजना
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) मार्च 2026 मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या 'भारत औद्योगिक विकास योजनेचे' (BHAVYA) मुख्य उद्दिष्ट काय आहे ?
1. देशात 100 नवीन विमानतळ बांधणे.
2. 100 अत्याधुनिक 'प्लग-अँड-प्ले' औद्योगिक पार्क विकसित करणे.
3. शेतकऱ्यांना मोफत खत पुरवठा करणे.
4. प्रत्येक गावात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे.
उत्तर : 100 अत्याधुनिक 'प्लग-अँड-प्ले' औद्योगिक पार्क विकसित करणे.
📰 बातमी काय ?
• केंद्र सरकारने मार्च 2026 मध्ये ‘भारत औद्योगिक विकास योजना (BHAVYA)’ मंजूर केली आहे.
• ही योजना राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमाचा (NICDP) एक भाग असून, ‘विकसित भारत’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या उद्दिष्टांना गती देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
🤔 ‘भारत औद्योगिक विकास योजना ’ म्हणजे नेमकं काय ?
• ही एक केंद्रीय स्तरावर मंजूर केलेली औद्योगिक पायाभूत सुविधा योजना आहे.
• या योजनेअंतर्गत देशभरात 100 ‘Plug-and-Play’ औद्योगिक पार्क विकसित करण्यात येणार आहेत.
• या योजनेसाठी सुमारे ₹33,660 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे उद्योगांना लवकर सुरूवात करण्यासाठी तयार पायाभूत सुविधा उपलब्ध होतील.
प्लग-अँड-प्ले (Plug-and-Play) मॉडेल म्हणजे काय ?
• ‘भारत औद्योगिक विकास योजने अंतर्गत उद्योजकांना जमिनीसह वीज, पाणी, रस्ते यांसारख्या सर्व सुविधा आधीपासून तयार (Ready-to-Use) स्वरूपात दिल्या जातील.
• यामुळे उद्योगांना दीर्घ प्रक्रिया न करता थेट उत्पादन सुरू करता येईल — यालाच ‘Plug-and-Play’ मॉडेल म्हणतात.
🏢 ‘भारत औद्योगिक विकास योजना ’ कोण राबवणार ?
• या योजनेचे धोरणात्मक नेतृत्व Department for Promotion of Industry and Internal Trade (DPIIT) कडे आहे, जे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.
• तर प्रत्यक्ष अंमलबजावणी नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (National Industrial Corridor Development Corporation) मार्फत केली जाणार आहे.
🎯 ‘भारत औद्योगिक विकास ’ योजनेमागचा उद्देश काय आहे ?
• या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे भारतात उत्पादनाधारित (Manufacturing-Led) आर्थिक वाढ गतीमान करणे.
• तसेच, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया सुलभ करून Ease of Doing Business सुधारण्यावर भर दिला आहे.
• यासोबतच, औद्योगिक क्लस्टर तयार करून पुरवठा साखळी (Supply Chain) मजबूत करणे, रोजगारनिर्मिती वाढवणे आणि गुंतवणूक आकर्षित करणे हेही महत्त्वाचे उद्देश आहेत.
⚙️ ‘भारत औद्योगिक विकास ’ योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?
• या योजनेत उद्योगांना पूर्व-मान्यताप्राप्त (pre-approved) जमीन, वीज, पाणी आणि परवानग्या दिल्या जातील, त्यामुळे उद्योग लगेच सुरू करता येतील.
• देशभरात 100 ते 1000 एकर क्षेत्रातील मोठे औद्योगिक पार्क विकसित केले जातील, ज्यामुळे विविध राज्यांमध्ये संतुलित औद्योगिक विकास होईल.
• सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाणार आहे — जसे की प्रति एकर ₹1 कोटीपर्यंत पायाभूत सुविधा विकासासाठी सहाय्य आणि बाह्य कनेक्टिव्हिटीसाठी 25% पर्यंत मदत.
• या पार्कमध्ये केवळ रस्ते, वीज, पाणीच नाही, तर गोदामे, चाचणी प्रयोगशाळा, कामगारांसाठी निवास अशा सर्व सुविधा एकत्रित दिल्या जातील.
• तसेच, Single-Window Clearance System आणि राज्यस्तरीय सुधारणा यामुळे उद्योगांना परवानग्या मिळवणे सोपे होईल.
• ही योजना पी.एम. गती शक्ती (PM GatiShakti) शी जोडलेली आहे, ज्यामुळे मल्टिमोडल कनेक्टिव्हिटी आणि लॉजिस्टिक्स सुधारेल.
• यामध्ये हरित ऊर्जा वापर, भूमिगत युटिलिटी (No-Dig Model) यांसारख्या पर्यावरणपूरक उपायांवरही भर दिला आहे.
भारत औद्योगिक विकास योजनेचे महत्त्व काय आहे ?
• ही योजना भारताला जागतिक उत्पादन केंद्र (Global Manufacturing Hub) बनवण्यास मदत करेल.
• या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल.
• तसेच, उद्योग सुरू करण्यातील अडथळे कमी होऊन भारतात देशांतर्गत व परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स : भारत औद्योगिक विकास योजना (BHAVYA)
• BHAVYA → औद्योगिक पायाभूत सुविधा योजना
• उद्दिष्ट → 100 अत्याधुनिक 'प्लग-अँड-प्ले' औद्योगिक पार्क विकसित करणे.
• निधी → ₹33,660 कोटी
• अंमलबजावणी → नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड

















