
चालू घडामोडी | वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026

World Happiness Report 2026
📚 Subject : GS - रिपोर्ट
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2026 च्या जागतिक आनंद अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट) नुसार भारताचा क्रमांक किती आहे ?
1. 65
2. 99
3. 104
4. 116
उत्तर : 116
📰 बातमी काय ?
• ‘आंतरराष्ट्रीय आनंद दिना’ निमित्त, संयुक्त राष्ट्रांनी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केली.
• आंतरराष्ट्रीय आनंद दिन दरवर्षी 20 मार्च रोजी साजरी करण्यात येतो.
🧐 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 कोणी प्रकाशित केला ?
• ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वेलबीइंग रिसर्च सेंटरने गॅलप आणि यूएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क च्या भागीदारीत वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 20 मार्च रोजी प्रकाशित केला.
• हा अहवाल तयार करताना देशातील उत्पन्न, सामाजिक आधार, निरोगी आयुष्य , स्वातंत्र्य, उदारता आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण या महत्त्वाच्या निकषांचा विचार केला जातो.
😊 जगातील सर्वात आनंदी देश कोणता ?
• वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार फिनलंड सलग नवव्या वर्षी जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे.
• अहवालानुसार फिनलंडचे लोक सर्वात आनंदी आहे.
1. फिनलंड (Finland) - पहिला
2. आइसलँड (Iceland) - दुसरा
3. डेन्मार्क (Denmark) - तिसरा
😥 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार सर्वात कमी आनंदी देश कोणता ?
• अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या म्हणजे च 147 व्या क्रमांकावर असून
• वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 नुसार अफगाणिस्तान हा जगातील सर्वात कमी आनंदी देश आहे.
शेवटचे तीन देश -
3) मलावी (Malawi) - 145 वा क्रमांक
2) सिएरा लिओन (Sierra Leone) - 146 वा क्रमांक
1) अफगाणिस्तान (Afghanistan) - 147 वा क्रमांक
🇮🇳 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा ?
• 2026 मध्ये भारताचा 116 वा क्रमांक आहे.
➫ (तर 2025 मध्ये भारताचा 118 वा क्रमांक होता. )
🌍 वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारत आणि शेजारील देशांचा क्रमांक :
• चीन – 65 वा क्रमांक
• नेपाळ – 99 वा क्रमांक
• पाकिस्तान – 104 वा क्रमांक
• भारत – 116 वा क्रमांक
• बांग्लादेश – 127 वा क्रमांक
• म्यानमार - 129 वा क्रमांक
• श्रीलंका – 134 वा क्रमांक
नोट : वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2026 मध्ये भारतापुढे चीन, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश आहे हे लक्षात ठेवा.



















